सध्या श्रीलंकेत भारत विरुद्ध श्रीलंका कसोटी सामना खेळला जातोय. विराट कोहलीची गर्लफ्रेंड आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माही नुकतीच श्रीलंकेत दाखल झाली. या दोघांचंही नातं आता जगजाहीर झालेलं आहे. पार्टी असो, शॉपिंग असो किंवा सुट्ट्यांचा आनंद घेणं असो या दोघांना अनेकदा एकत्र पाहिलं गेलंय. विराट-अनुष्काची जोडी नेहमीच चाहत्यांना आकर्षित करते. नुकतेच दोघांचे काही नवीन फोटो समोर आले आहेत. ज्यामध्ये विराट आणि अनुष्का वृक्षारोपण करताना दिसत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या फोटोआधी तुम्ही विराटचा इन्स्टाग्राम अकाऊंटचा डिसप्ले पिक्चर (डीपी) नक्की पाहा. विराटने अनुष्कासोबतचा फोटो डीपीवर ठेवलाय. सध्या क्रिकेट सामन्यांसाठी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत विराट श्रीलंकेतच राहणार आहे. त्याच्यासोबत वेळ घालवण्यासाठी अनुष्काही तिथे दाखल झाली आहे. फावल्या वेळेत विराट कोहली आणि त्याच्या सहकाऱ्यांनी श्रीलंकेत पर्यटनाचाही आनंद लुटला. यावेळी दोघंही जण काही श्रीलंकन चाहत्यांसोबत सेल्फी घेताना दिसले होते. विराट आणि अनुष्काचा वृक्षारोपण करतानाचा फोटोही क्षणार्धात सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

 

वाचा : ‘इंदू सरकार’मुळेच माझी उचलबांगडी; पहलाज निहलानींचा गौप्यस्फोट

अनुष्का श्रीलंकेत दाखल झाली त्याच दिवशी भारतीय संघाने श्रीलंकेवर कसोटी मालिकेत ३-० अशी मात केली. तर शुक्रवारी विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेट करिअरमध्ये नऊ वर्ष पूर्ण केली. हा दिवस साजरा करण्यामध्ये त्याची गर्लफ्रेंड अनुष्का त्याला साथ देतेय. वृक्षारोपण करुन दोघांनीही अनोख्या प्रकारे हा आनंद साजरा केला.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virat kohli and anushka sharma planting a sapling together in sri lanka photos
First published on: 20-08-2017 at 13:19 IST