भारतीय संघाचा गोलंदाज झहीर खान याच्यापाठोपाठ कर्णधार विराट कोहलीही काल विवाहबंधनात अडकला. गेल्या काही वर्षांपासून विराट बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माला डेट करत होता. हे दोघं अमुक तारखेला लग्न करणार अशा अनेकदा अफवा पसरल्या होत्या. मात्र, काल अखेर विरुष्काने त्यांच्या लग्नाची बातमी जाहीर करत त्यांच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. इटलीतील टस्कनी येथे हे प्रेमीयुगुल विवाहबद्ध झाले. अगदी नेमक्या नातेवाईकांच्या हजेरीत हा लग्नसोहळा उरकला. विरुष्काच्या लग्नाने त्यांच्या चाहत्यांना धक्का तर बसलाच पण त्यांनी ज्या ठिकाणी लग्न केले त्या रिसॉर्टचे भाडे ऐकल्यावर तुम्ही नक्कीच अवाक् व्हाल.

Inside videos : विराट-अनुष्काच्या साखरपुड्यापासून लग्नाचा व्हिडिओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फोर्ब्सने दिलेल्या माहितीनुसार, ख्रिसमस आणि नवीव वर्षाच्या काळात Borgo Finocchieto हे जगातील दुसरे महागडे रिसॉर्ट आहे. या काळात हे रिसॉर्ट दर आठवड्याला ९४,८३,२१० रुपये भाडे घेते. याचाच अर्थ दर दिवासामागे १३,५४,७४४ रुपये इतके भाडे मोजावे लागते. Borgo Finocchieto हे आठशे वर्षांपूर्वी वसलेले गाव आहे. काही वर्षांपूर्वी जॉन फिलिप्स याने या गावाचा कायापालट केला.

Year End 2017 Special : यंदा या मराठी कलाकारांच्या घरी वाजले सनई-चौघडे

फ्लोरेन्स विमानतळपासून तासाभराच्या अंतरावर टस्कनीतील निसर्गरम्य ठिकाणी बोर्गो रिसॉर्ट आहे. या रिसॉर्टमध्ये २२ बेडरुम्स आणि सुट्सची व्यवस्था आहे. तसेच, स्विमिंगपूल, जीम, स्पा, टेनिस कोर्टची सुविधाही यात आहे.