‘क्रिश-३’नंतर चित्रपटांपासून दूर राहिलेला अभिनेता विवेक ओबेरॉय दरम्यानच्या काळात आपली पित्याची भूमिका निभावण्यात व्यस्त होता. विवान या आपल्या मुलाची देखभाल करणे आणि त्याच्याबरोबर मजा-मस्ती करण्याचा आनंद तो लुटत होता. गेल्यावर्षी ६ फेब्रुवारी रोजी विवेक आणि अल्वा या दांम्पत्याच्या जीवनात विवानचे आगमन झाले. हृतिक रोशनबरोबरच्या ‘क्रिश-३’ चित्रपटानंतर कुटुंबासमवेत आपण मोठ्या सुट्टीवर जाणार असल्याचे विवेकने आधीच जाहीर केले होते. एका कार्यक्रमाच्या ठिकाणी आलेल्या विवेकने ‘क्रिश-३’नंतरची आपली सुट्टी मजेत गेल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे, सुट्टीदरम्यान मुलगा विवानची देखभाल करण्यात वेळ आनंदात व्यतीत केल्याचेदेखील तो म्हणाला. ‘क्रिश-३’ चित्रपटत आपण साकारलेल्या ‘काल’ या खलनायकाला लहान मुलांनी दिलेली पसंती पाहून बरे वाटल्याचे देखील तो म्हणाला.