भोजपुरी सिनेसृष्टीतील गाण्यांवर अनेकदा अश्लिलतेचा ठपका लावला जातो. या गण्यांमार्फत स्त्रियांचा अपमान केला जातो अशीही तक्रार वारंवार केली जाते. या तक्रारींवर अभिनेते, भाजपा खासदार रवी किशन यांनी प्रतिक्रिया दिली. भोजपुरी सिनेसृष्टीतील अश्लिलता रोखण्यासाठी ते संसदेत आवाज उठवतील असं आश्वासन त्यांनी दिलं आहे.

पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी रवी किशन यांनी भोजपुरी सिनेसृष्टीवर भाष्य केलं. ते म्हणाले, “भोजपुरी भाषेला १००० वर्षांचा इतिहास आहे. देशभरातील जवळपास २५ कोटी लोकांची ही मातृभाषा आहे. पण या भाषेचा चित्रपटाच्या माध्यमातून वारंवार अपमान होत आहे. अश्लिलता रोखण्यासाठी भोजपुरी इंडस्ट्रीत देखील सेंसर बोर्ड यायला हवं. याबाबत मी लवकरच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा करणार आहे. या मुद्द्यावर मी संसदेत देखील आवाज उठवणार आहे.” असं आश्वासन रवी किशन यांनी दिलं.