अॅक्शन, कॉमेडी आणि नाट्यमय घटनांनी भरलेले असे विविध चित्रपट बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमारने वीस वर्षाच्या त्याच्या कारकिर्दीत केले आहेत. असे असले तरी, आता आरवला म्हणजेच त्याच्या मुलाला आवडतील, असे चित्रपट करण्याची अक्षयची इच्छा आहे. १०० कोटी अथवा २०० कोटीचे उद्दिष्ट ठेऊन चित्रपट करण्यापेक्षा त्याला चांगले चित्रपट करायचे आहेत. मुलगा आरवला आवडतील असेच चित्रपट करण्याची त्याची मनिषा आहे. जर आरवला माझा चित्रपट आवडला नाही, तर चित्रपट न समजल्याची प्रतिक्रिया तो आपल्याला देत असल्याचे अक्षय म्हणाला. आजच्या घडीला चित्रपटसृष्टीतले आघाडीचे कलाकार एक अथवा दोनच चित्रपट करत असताना, अक्षय कुमार आजही त्यांच्यापेक्षा जास्त चित्रपट करीत आहे. अक्षयसाठी ही फार मोठी बाब नाही. याविषयी बोलताना तो म्हणतो, वर्षभरात चारपेक्षा अधिक चित्रपट करण्यावरून लोक मला नाव ठेवतात. परंतु, हे अशक्य नाही. वेळेचे बंधन पाळल्यास हे सहज शक्य असल्याचे त्याचे म्हणणे आहे. आता अक्षय कुमार आघाडीचा कलाकार असला, तरी त्याचा हा प्रवास सोपा नव्हता. जेव्हा त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करीत नव्हते, तेव्हा ज्या चित्रपटकर्त्यांनी त्याला नाकारले होते, ते आज त्याच्या घराबाहेर रांगा लावून उभे असतात. परंतु, आता परिस्थिती बदलली असून, अक्षय कुमार त्याच्या नियम आणि अटींवर काम स्वीकारतो.
अभिषेक शर्मा दिग्दर्शित विनोदी चित्रपट ‘दी शौकिन्स’मध्ये अनुपम खेर, अन्नू कपूर, पियुष मिश्रा आणि लिसा हेडन हे अक्षय कुमारचे सहकलाकार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Want to do films that my son can enjoy akshay kumar
First published on: 04-11-2014 at 04:18 IST