बॉलीवूड अभिनेता अभिषेक बच्चनने काही दिवसांपूर्वीच त्याचा ४०वा वाढदिवस साजरा केला. अभिषेकच्या बर्थडे सेलिब्रेशनसाठी संपूर्ण बच्चन कुटुंबिय मालदीवला गेले होते. त्यानंतर भारतात परतल्यानंतर अभिषेक आणि ऐश्वर्या आपल्या लेकीसह बंगळुरु येथे कबड्डी मॅच पाहण्यासाठी गेले. अभिषेकची मालकी असलेल्या जयपूर पिंक पॅन्थर या संघाच्या टीमने यावेळी अभिषेकचा वाढदिवस केक कापून साजरा केला. याचा व्हिडिओ एका चाहत्याने यू ट्यूबवर टाकला आहे. या व्हिडिओत अभिषेक केक कापताना दिसतो. पण या व्हिडिओत बघण्यासारखी गोष्ट म्हणजे अभिषेक-ऐशची चिमुरडी आराध्या आपल्या इवल्या हाताने तिच्या बाबाला केक भरवताना दिसते.
संग्रहित लेख, दिनांक 12th Feb 2016 रोजी प्रकाशित
VIDEO: आराध्याने अभिषेकला भरवला बर्थडे केक
अभिषेकने काही दिवसांपूर्वीच त्याचा ४०वा वाढदिवस साजरा केला.
Written by लोकसत्ता टीमguravchaitali

First published on: 12-02-2016 at 16:49 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Watch aaradhya feeding bday cake to papa abhishek