‘क्वीन’ या चित्रपटाने बॉलीवूडमध्ये आपली छाप पाडणा-या दिग्दर्शक विकास बहलने आलिया भट्टसह एक लघुपट तयार केला आहे. या लघुपटाचे नाव ‘गोइंग होम’ असे आहे. हा व्हिडिओ वायरल झाला असून, सध्या सर्वत्र सोशल मिडियावर फिरत आहे.
‘गोइंग होम’ या पाच मिनिटांच्या व्हिडिओमध्ये हे जग खरचं महिलांसाठी सुरक्षित आहे का? यावर चित्रीकरण करण्यात आले आहे. व्हिडिओत आलिया भट्ट ही एकटीच रात्रीच्या वेळी निर्जन रस्त्यावरून गाडी चालविताना दिसते. त्यानंतर तिच्या आईचा फोन येतो. त्यावर “मी १० मिनिटात घरी पोहचेन”, असे ती आईला म्हणते. पण, गाडी मध्येच बंद पडल्याने ती मध्येच वाटेत अडकते. गाडीत एकट्या मुलीला पाहून एक गाडी थांबते. त्यात पाच मुले असतात. आलिया त्यांच्याकडून मदत मागते. मदतीच्या नावाखाली ही पाच मुले आलियासोबत काय करतात? आलिया त्यांच्यासोबत सुरक्षित राहते का? की ती लैँगिक अत्याचाराला बळी पडते? हे या व्हिडिओत पाहावयास मिळते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Watch alia bhatts short film are women safe around unknown men
First published on: 21-10-2014 at 12:26 IST