बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करावं असं प्रत्येक कलाकाराला वाटत असतं. बॉलिवूडमधील अनेक आघाडीच्या कलाकारांनी बिग बींसोबत काम केलं आहे. त्यामुळे त्यांची बिग बींसोबत काम करण्याची इच्छादेखील पूर्ण झाली आहे. आता पहिल्यांदाच अभिनेता इम्रान हाश्मी बिग बींसोबत ‘चेहरे’ या चित्रपटात काम करणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून बिग बी आणि इम्रानला एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इम्रान हाश्मीने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर ‘चेहरे’ चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. या ४५ सेकंदाच्या टीझरमध्ये अनू कपूर, इम्रान हाश्मी आणि अमिताभ बच्चन यांचा आवज ऐकू येत आहे. तिघे ही गुन्हेगारी, न्याय आणि इमानदारी यावर बोलताना दिसत आहेत. सध्या सोशल मीडियावर चित्रपटाचा टीझर चर्चेत असून व्हायरल झाला आहे. टीझर पाहाता चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबची उत्सुकता वाढली आहे.

९ एप्रिल २०२१मध्ये ‘चेहरे’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या पूर्वी हा चित्रपट २०२०मध्ये प्रदर्शित होणार होता. परंतू करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. ‘चेहरे’ चित्रपटाचे दिग्दर्शन रुमी जाफरी यांनी केले आहे. या चित्रपटात कलाकारांची फैज पाहायला मिळणार आहे. अमिताभ आणि इम्रानसोबतच रघुबीर यादव आणि सिद्धांत कपूर देखील दिसणार आहेत. तसेच क्रिस्टल डीसूजासोबत रिया चक्रवर्ती देखील चित्रपटात दिसणार असल्याचे म्हटले जाते. पण चित्रपटाचे पोस्टर किंवा टीझरमध्ये अद्याप रियाची झलक दिसलेली नाही.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Watch chehre teaser amitabh bachchan emraan hashmi film avb
First published on: 11-03-2021 at 15:01 IST