तरुणाईला साद घालत “मुंबई पुणे मुंबई -२ लग्नाला यायचंच” चित्रपटाचे पहिले रोमँटिक गीत “साथ दे तू मला वडाळा येथील विद्यालंकार महाविद्यालयात आगळ्या पद्धतीने नुकतेच प्रदर्शित करण्यात आले. “साथ दे तू मला, अलगद वाऱ्यावर उडती बट सांगते तुला ….” या गाण्याचे प्रकाशन तरुणांसमोर करतानाच मुक्ता-स्वप्निल या जोडीने आपल्या चाहत्यांसमोर मनमुराद गप्पाही मारल्या. बेला शेंडे आणि हृषीकेश रानडे यांनी हे गीत गायले असून अविनाश-विश्वजित यांनी संगीत दिले आहे. स्वप्निल आणि मुक्ताने या गीत प्रकाशनानंतर महाविद्यालयातील तरुणांनी विचारल्यालेल्या अनेक प्रश्नांना मनमुराद उत्तरे दिली. प्रेमाविषयी या विद्यार्थ्यांनी या दोघांना अनेक प्रश्न विचारले आणि गप्पाही मारल्या. यावेळी दिग्दर्शक सतीश राजवाडे, संगीतकार अविनाश- विश्वजित, गायिका  बेला शेंडे, गायक हृषीकेश रानडे, गीतकार अश्विनी शेंडे, मीराह एन्टरटेनमेंटचे अमित भानुशाली आणि एव्हरेस्ट एन्टरटेनमेंटचे संजय छाब्रिया आदी मान्यवर उपस्थित होते.