पाहा ‘उंगली’ चित्रपटाचे ट्रेलर

बहुप्रतिक्षित ‘उंगली’ चित्रपटाचे ट्रेलर प्रसिद्ध झाले असून, इमरान हाश्मी, कंगना राणावत, रणदीप हुडा, निल भूपालम आणि अंगत बेदी या पाच तरुणांच्या गँगचा हा चित्रपट आहे.

बहुप्रतिक्षित ‘उंगली’ चित्रपटाचे ट्रेलर प्रसिद्ध झाले असून, इमरान हाश्मी, कंगना राणावत, रणदीप हुडा, निल भूपालम आणि अंगत बेदी या पाच तरुणांच्या गँगचा हा चित्रपट आहे. देशात सर्वत्र पसरलेल्या भ्रष्टाचाराविरुद्ध ही पाच जणांची गँग उभी ठाकते. जो कोणी भ्रष्टाचार करेल, त्याला आपले मधले बोट दाखवून ते निषेध नोंदवितात. चित्रपटात संजय दत्त पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट पाहाणे म्हणजे धमाल मस्ती असल्याचे चित्रपटातील आकर्षक स्टारकास्ट आणि काही चटपटीत वाक्ये दर्शवितात. रेनसिल डिसिल्व्हा दिग्दर्शित ‘उंगली’ चित्रपट २८ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Watch sanjay dutt chases emraan hashmi kangana ranaut and the ungli gang

ताज्या बातम्या