बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानने त्याच्या वाढदिवसाच्या औचित्यावर आगामी ‘फॅन’ चित्रपटाचा दुसरा टीझर प्रदर्शित केला आहे. आज शाहरुख त्याचा ५०वा वाढदिवस साजरा करत आहे.
शाहरुखने ट्विटरवर ‘फॅन’चा टीझर टाकला असून, यात फॅन गौरवची झलक दाखविण्यात आलेली आहे. एका लहान मुलापासून टीझरची सुरुवात होते. आपला आवडता अभिनेता आर्यन खानसाठी असलेले त्याचे प्रेम यात पाहावयास मिळते. त्यानंतर मोठा झालेला हा गौरव कोण साकारतोय याबद्दल तुम्हाला उत्सुकता असेलच ना.. तर हा गौरव आहे खुद्द शाहरुख खान आणि विशेष म्हणजे त्याचा यातील लूक पाहून तुम्हीसुद्धा चक्क व्हाल. या टीझरमध्ये शाहरुखच्या जुन्या मुलाखतींचादेखील समावेश आहे.
दरम्यान, काल रात्री शाहरुखने आपल्या चाहत्यांसोबत त्याचा वाढदिवस साजरा केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Watch shah rukh khans fan teaser
First published on: 02-11-2015 at 11:54 IST