अभिनेता जॅकी श्रॉफ यांचा मुलगा टायगर श्रॉफ हा ‘हिरोपंती’ या चित्रपटाने बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे.
चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये टायगर काही अॅक्शन दृश्य आणि प्राणघातक स्टंट करताना दिसतो. त्यामुळे अॅक्शन, ड्रामा आणि रोमाण्टिक दृश्ययांनी चित्रपटाच्या शिर्षकाला टायगर पूर्णपणे जागला आहे, असे म्हणण्यास हरकत नाही. यातील अभिनेत्री क्रीती सनोन ही दाक्षिणात्य अभिनेत्री आणि मॉडेल असून, तिदेखील यात फार सुंदर दिसत आहे. हिरोपंतीची प्रेमकथा ही बोल्ड बबलू आणि खोडकर डिंपीवर असून, क्रूर कुळ आणि वाढत्या हिंसकतेविरुद्ध हा भाष्य करतो. सदर चित्रपटातील भूमिकेकरिता टायगरने खासकरून मार्शल आर्ट्स प्रशिक्षण घेतले आहे. सबीर खान दिग्दर्शित आणि साजिद नादियदवालाची निर्मिती असलेला ‘हिरोपंती’ २३ मेला प्रदर्शित होत आहे. मि.परफेक्टशनिस्ट आमिर खानने ४ एप्रिलला या चित्रपटाच्या पहिल्या ट्रेलरचे अनावरण केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Watch trailer tiger shroff in heropanti
First published on: 04-04-2014 at 06:54 IST