प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक प्रभू देवा याने नुकतेच लोणावळा येथील वॅक्स म्युझियममध्ये आपल्या स्वत:च्या मेणाच्या पुतळ्याचे अनावरण केले. मेणाच्या पुतळ्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या मादाम तुसॉं या परदेशातील म्युझियानंतर लोणावळा येथील म्युझियममध्ये अतिशय वेगवेगळ्या क्षेत्रातील आणि भारतातील प्रसिध्द व्यक्तिंचे पुतळे पाहता येतात. प्रभू देवाने नुकतीच अजय देवगणबरोबर एका वेगळ्या विषयावरील चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात केली आहे. आपल्या मेणाच्या पुतळ्याबरोबर कॅमे-याला पोझ देताना प्रभू देवा थोडासा लाजतच होता. काय रे तुला माझ्यासारख्या डान्स मुव्हज् येतात का? असेही प्रभू देवा त्याच्याच मेणाच्या पुतळ्याला विचारत नसेल ना? असाही प्रश्न यावेळी अनेकांना पडला. माझ्या या पुतळ्याविषयी घरात कुणालाच ठावूक नसून, हे सर्वांसाठी मोठे सरप्राईज असणार आहे, असंही तो यावेळी म्हणाला.
प्रभू देवाचे ट्विट – ”आजचा दिवस माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. नुकतेच लोणावळा येथील वॅक्स म्युझियममधील माझ्या मेणाच्या पुतळ्याचे अनावरण केले. या क्षणी मी खूप भावूक झालो आहे. सुनील आणि त्याच्या सहका-यांचे काम अतिशय उत्तम आहे.”
पहा व्हिडिओ : मेणाचा ‘प्रभू देवा’!
संग्रहित लेख, दिनांक 6th Sep 2013 रोजी प्रकाशित
पहा व्हिडिओ : मेणाचा ‘प्रभू देवा’!
प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक प्रभू देवा याने नुकतेच लोणावळा येथील वॅक्स म्युझियममध्ये आपल्या स्वत:च्या मेणाच्या पुतळ्याचे अनावरण केले.

First published on: 06-09-2013 at 08:36 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Watch video prabhudeva gets immortalised in wax