scorecardresearch

‘करिश्मासोबत माझं ब्रेकअप झालेलं नाही’

आम्ही विभक्त झालेलो नाही. प्रत्येक नात्यात उतार-चढाव येत असतात, पण प्रेमाने सारेकाही जिंकता येते

‘करिश्मासोबत माझं ब्रेकअप झालेलं नाही’
उपेन पटेल याने सोमवारी करिश्मासोबतच्या नात्याला पूर्णविराम देत असल्याचे ट्विट केले होते

करिश्मासोबतच्या ब्रेकअपची माहिती देणाऱया उपेन पटेलने आता आपल्या विधानावर घुमजाव केले आहे. करिश्मासोबत माझं ब्रेकअप झालेलं नाही, असा खुलासा करून उपेनने चर्चेला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.
आम्ही विभक्त झालेलो नाही. प्रत्येक नात्यात उतार-चढाव येत असतात, पण प्रेमाने सारेकाही जिंकता येते, असे ट्विट उपेन पटेलने केले आहे.
दरम्यान, उपेन पटेल याने सोमवारी करिश्मासोबतच्या नात्याला पूर्णविराम देत असल्याचे ट्विट केले होते. करिश्मा आणि मी परस्पर संमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. तुमच्या प्रेमाबद्दल आभार, असे ट्विट उपेन पटेलने केल्यानंतर टेलिव्हिजन विश्वाला आश्चर्याचा धक्का बसला होता. एवढेच नाही, तर ‘अनेक गोष्टी उजेडात आल्या आहेत, खरे रंग दिसू लागले आहेत. प्रेम कधीच सोपं नसतं. एकदा काही गोष्टी तुटल्या की त्यांच्यासह पुढे जाणं कठीण असतं’ असेही उपेनने ट्विट केले होते. मात्र, उपेनने आज केलेल्या ट्विटने सारं चित्रच पालटून गेले आहे. उपेनने आता सारं काही आलबेलं असल्याचे म्हटले असले तरी दोघांमध्ये खटके उडाल्याची चर्चा आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-05-2016 at 11:48 IST

संबंधित बातम्या