scorecardresearch

Premium

Video: फोटो काढायला आलेल्या चाहतीनं प्रभासच्या गालावर मारली चापट, क्षणभर अभिनेताही गोंधळला अन्…

Viral Video: जेव्हा भर गर्दीत चाहतीने प्रभासच्या गालावर मारलं, पुढे काय घडलं, तुम्हीच पाहा

when prabhas female fan slaps him after clicking photo with him video viral
चाहतीने प्रभासला मारलेली चापट, व्हिडीओ पाहिलात का? (फोटो – व्हिडीओतून स्क्रीनशॉट)

दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास ‘आदिपुरुष’नंतर ‘सालार’ चित्रपटात दिसणार आहे. ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. त्यामुळे त्याच्या ‘सालार’ चित्रपटाकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. चाहत्यांमध्ये या चित्रपटाची खूप उत्सुकता पाहायला मिळत आहे. अशातच प्रभासचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये फोटो काढायला आलेली एक चाहती त्याला चापट मारताना दिसते.

Video: मामी-भाचीचा रॅम्पवर जलवा! ऐश्वर्या रायचा Classy Walk तर नव्या नवेलीचे पॅरिस फॅशन विकमध्ये पदार्पण

balmaifal, cat, love, kittens, story, memory, kids, child, mother,
बालमैफल : मांजरीचं प्रेम..
combative attitude of Sikh community
चाहे हंजूगॅस बरसाओ, या गोळीया… शेतकरी आंदोलनात ‘जट्ट दा जुगाड’
Vijay Sethupati Co-actress Dies As Drunk Son Beats Her Kadaisi Vivasayi actor Kasiammal Son Arrested For Killing Mother at 74
विजय सेतुपतीच्या चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलाने केलेल्या मारहाणीत मृत्यू; मद्यधुंद लेकाला पोलिसांकडून अटक
Malad
माणुसकीला काळिमा! मुंबईत गटारात फेकलेल्या गोणीत सापडलं नवजात बालक, प्राणीप्रेमीच्या ‘या’ कृतीमुळे मिळालं जीवदान

प्रभासला एका चाहतीने उत्साहात गालावर चापट मारल्याचा एक व्हिडीओ पुन्हा व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ २०१९ मध्ये व्हायरल झाला होता. प्रभासला एअरपोर्टवर पाहताच एक चाहती त्याच्याबरोबर फोटो काढायला गेली. तिने त्याच्याबरोबर फोटो काढला. त्यानंतर तिने त्याच्या गालावर चापट मारली. नक्की काय घडलं, असा विचार क्षणभर तर प्रभासही करत राहिला. त्यानंतर त्याने इतर चाहत्यांबरोबर फोटो काढले असं व्हिडीओत दिसतंय.

दरम्यान, अभिनेत्याच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास त्याचा आगामी ‘सालार’ आधी २८ सप्टेंबर रोजी रिलीज होणार होता. पण चित्रपटाचं काम पूर्ण न झाल्याने दिग्दर्शक प्रशांत नील यांनी प्रदर्शन डिसेंबरपर्यंत पुढे ढकलले आहे. गेल्या आठवड्यात याबाबत घोषणा करण्यात आली. टीमने रिलीज डेट असलेले नवीन पोस्टर शेअर केले. ज्यात २२ डिसेंबर २०२३ ही तारीख लिहिली आहे.

“विवेक अग्निहोत्रीने नशेत माझ्याबरोबर…”, महिलेचा आरोप; कंगना रणौत उत्तर देत म्हणाली, “मला बरबाद…”

२२ डिसेंबरला दोन आघाडीच्या अभिनेत्यांच्या दोन चित्रपटात स्पर्धा पाहायला मिळणार आहे. यंदा दोन सुपरहिट चित्रपट देणाऱ्या शाहरुख खानचा ‘डंकी’ त्याच दिवशी रिलीज होत आहे. आता ‘सालार’च्या निर्मात्यांनी त्याच दिवशी चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: When prabhas female fan slapped him after clicking photo with him video viral hrc

First published on: 02-10-2023 at 14:50 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×