रेखा या बॉलिवूडमधील अशा अभिनेत्रींपैकी एक आहेत ज्यांनी आपल्या दमदार अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. रेखा यांनी त्यांच्या बॉलिवूड कारकिर्दित अनेक सुपरहिट चित्रपट दिले. पण चित्रपटांव्यतिरिक्त त्या त्यांचं खासगी आयुष्य आणि बेधडक वक्तव्यांमुळेही चर्चेत राहिल्या आहेत. रेखा यांचं लव्ह लाइफ, लग्न याची बरीच चर्चा त्याकाळी झाली होती. पण याशिवाय त्यांनी एकेकाळी पुरुष आणि शरीरसंबंध याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे बरीच खळबळ माजली होती.

रेखा यांनी त्यांच्या आयुष्याशी संबंधीत काही किस्से त्यांच्या आत्मचरित्रात सांगितले आहेत. या पुस्तकात त्यांच्या अशा काही वक्तव्यांबद्दल लिहिलं गेलं आहे. जी वक्तव्य बराच काळ चर्चेत राहिली होती. एकदा रेखा यांनी पुरुष आणि शरीरसंबंध यावर खळबळजनक वक्तव्य केलं होतं. ज्याची त्याकाळी बरीच चर्चा झाली होती.  

Loksatta lokjagar discussion temperament through Defamation character
लोकजागर: चारित्र्यावर चर्चा का?
Kangana Ranaut Vikramaditya Singh Himachal Pradesh Mandi Loksabha Election 2024
Celebrity Fight: कंगनासमोर राजघराण्यातील वंशजाचे आव्हान; सोनिया गांधींनी केली वाट बिकट
iPhone users in 91 countries warned to beware of Pegasus like spyware
‘पेगॅसस’सारख्या स्पायवेअरपासून सावधान! ९१ देशांतील आयफोन वापरकर्त्यांना इशारा
Loksatta Lokrang A Journey into Documentary Creation movies dramatist
 आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: ‘मला खूप भूक लागली होती…’

रेखा यांच्या आत्मचरित्रानुसार एकदा रेखा यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं की, ‘जर तुम्हाला पुरुषाशी जवळीक साधायची असेल तर हे तुम्ही फक्त शरीरसंबंधांच्या माध्यमातूनच करू शकता. तुम्ही जोपर्यंत त्या पुरुषासोबत शरीरसंबंध प्रस्थापित करत नाही तोपर्यंत तुम्ही त्याच्याशी जवळीक साधू शकणार नाही.’ रेखा यांच्या या वक्तव्यानं त्यावेळी बरीच खळबळ माजली होती.

अर्थात रेखा शरीरसंबंधाच्या विषयावर अनेकदा बोलल्या आहेत. एकदा त्यांनी आपल्या वक्तव्यातून लग्नाआधी शरीरसंबंध ठेवण्याला संमती दर्शवली होती. एवढंच नाही तर असे विचार नसलेल्या लोकांना ढोंगी म्हटलं होतं. त्या म्हणाल्या होत्या, ‘जर लग्नाआधी कोणी शरीरसंबंध ठेवत असेल तर हे नैसर्गिक आहे. लोक म्हणत असतील की, मुलींनी लग्नाआधी शरीरसंबंध ठेवू नये तर ते लोक ढोंगी आहेत.’ रेखा यांची अभिनय कारकिर्द यशस्वी ठरली असली तरी त्यांच्या खासगी आयुष्यात मात्र त्यांना बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागला होता. त्यामुळे त्या सातत्यानं चर्चेत राहिल्या होत्या.