तो येणार तो येणार अशी चर्चा सर्वत्र होती.. त्याच्या येण्याबद्दल प्रत्येकाच्या मनात उत्सुकता आणि कुतुहल जागं झालं होतं.. आणि तो आला, त्याने पाहिलं आणि त्याच्या आजवरच्या लौकिकाप्रमाणेच त्याने सारं काही जिंकूनही घेतलं.. तो म्हणजे बॉलीवुडचा किंग शाहरूख खान. आपल्या आगामी ‘फॅन’ चित्रपटाच्या प्रसिद्धीच्या निमित्ताने शाहरूखने हजेरी लावली झी मराठीवरील लोकप्रिय असलेल्या ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमात. या चित्रपटाच्या निमित्ताने थुकरटवाडीत आलेल्या शाहरूखने उपस्थितांची मने तर जिंकलीच आणि सोबतच यातील कलाकारांनी केलेल्या धम्माल विनोदाने शाहरूखही या सर्वांचा ‘फॅन’ झाला.
दरम्यान, या कार्यक्रमात शाहरूखचा दिल्लीपासून ते मुंबईपर्यंतचा आणि फौजी मालिकेपासून ते सुपरस्टार बनण्यापर्यंतचा जीवनप्रवास एका अनोख्या पद्धतीने दाखविण्यात आला जो बघून शाहरूखही भावूक झाला. कामाच्या या धावपळीत, धकाधकीत या गोष्टींचा कुठे तरी विसर पडला होता परंतु तुम्हा सर्वांमुळे मला माझ्या सुरूवातीच्या प्रवासाची, संघर्षाची गोष्ट पुन्हा एकदा बघायला मिळाली त्यामुळे मी तुम्हा सर्वांचा खुप खुप आभारी आहे. या क्षणाला मी खूप भावनिक झालो असून या भावना शब्दांत व्यक्त करणं खरच कठीण आहे असं मतही त्याने व्यक्त केलं.
एकंदरीतच शाहरूख खानचा सहभाग असलेला हा चला हवा येऊ द्या चा धम्माल १७५ वा भाग येत्या सोमवारी म्हणजेच ११ एप्रिलला रात्री ९.३० वा. प्रेक्षकांना बघता येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When shah rukh khan get emotional on chala hawa yeu dya
First published on: 08-04-2016 at 14:38 IST