यंदाचा ऑस्कर पुरस्कार सोहळा नेहमीपेक्षा जास्त गाजला. हा सोहळा विजेत्यांमुळे किंवा ग्लॅमरमुळे गाजला नाही, तर एका अशा गोष्टीमुळे गाजला जिची चर्चा सध्या जगभरात होत आहे. अभिनेता विल स्मिथने सोहळ्याच्या निवेदक ख्रिस रॉकला भर कार्यक्रमात जागतिक मंचावर कानशिलात लगावली. यावरून जगभरात प्रतिक्रिया उमटल्या. ख्रिस रॉकने जेव्हा विलच्या पत्नीवर विनोद केला, त्यानंतर विलने त्याच्या कानशिलात लगावली. त्यानंतर विलने ख्रिसची माफी मागितली होती. दरम्यान, आता अभिनेता विल स्मिथने हॉलिवूडच्या अॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसचा राजीनामा दिला आहे. ख्रिस रॉकला त्याने मारलेली थापड ही ‘धक्कादायक, वेदनादायक आणि अक्षम्य चूक’ असल्याचं विलने म्हटलंय.

विलने एक निवेदन जारी केलंय. त्यात तो म्हणतो की, “मी अकादमीच्या विश्वासाचा विश्वासघात केला आहे. मी इतर नामांकित आणि विजेत्यांना त्यांच्या असामान्य कार्यासाठी आनंद साजरा करण्याची संधी हिरावून घेतली आहे. मी दु:खी आहे. म्हणून, मी अॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे आणि बोर्डाकडून जी कारवाई केली जाईल, त्याचे पुढील परिणाम मी स्वीकारेन,” असं विल स्मिथने म्हटलंय.

Salman Khan firing case Facebook account named Anmol Bishnoi was opened on same day of shooting
अभिनेता सलमान खान गोळीबार प्रकरण : गोळीबाराच्या दिवशीच अनमोल बिष्णोई नावाचे फेसबुक खाते उघडले
Rohit Sharma Talking about his retirement in the Breakfast with Champions show
रोहित शर्मा कधी म्हणणार क्रिकेटला अलविदा? हिटमॅनने निवृत्तीबाबत केलं मोठं वक्तव्य
Aarti Singh To Marry Boyfriend Deepak Chauhan
प्रसिद्ध अभिनेत्री ३९ व्या वर्षी करतेय अरेंज मॅरेज, नवी मुंबईचा आहे होणारा पती; म्हणाली, “माझ्या आयुष्यात…”
juna furniture teaser released by salim khan
ज्येष्ठ नागरिकांचा सहानुभूतीने विचार करायला हवा

जिच्यासाठी जागतिक मंचावर विल स्मिथने ख्रिस रॉकच्या कानशिलात लगावली, त्या जाडाची ‘अशी’ होती प्रतिक्रिया; व्हिडीओ व्हायरल

विल स्मिथच्या या कृत्यानंतर त्यावर जगभरातून प्रतिक्रिया उमटल्या. काहींनी विलला पाठिंबा दिला, तर काहींनी विलने केलेल्या कृत्याचा विरोध केला. दरम्यान, आता या घटनेला आणि सोहळ्याला आठवडा होत आला असताना विलने हॉलिवूडच्या अॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसचा राजीनामा दिला आहे. शिवाय त्याने ख्रिसला मारल्याबद्दल माफी मागत दिलगिरी व्यक्त केली आहे.