scorecardresearch

‘वाय’ या मल्टिस्टारर थरारपटात दिसणार ‘हे’ कलाकार

‘वाय’ या चित्रपटात मुक्ता बर्वे, प्राजक्ता माळी आणि रसिका चव्हाण मुख्य भूमिकेत दिसत आहे.

y movie, mukta barve, prajakta mali,
'वाय' या चित्रपटात मुक्ता बर्वे, प्राजक्ता माळी आणि रसिका चव्हाण मुख्य भूमिकेत दिसत आहे.

अजित सूर्यकांत वाडीकर लिखित व दिग्दर्शित ‘वाय’ हा चित्रपट येत्या २४ जून रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित असून, मराठीत पहिल्यांदाच असा हायपरलिंक थरार प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. पहिल्या पोस्टरपासूनच खरंतर या चित्रपटाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. अनेक चित्रपटगृहांमध्ये दिसणाऱ्या स्टँडीज मुळेही ‘वाय’ या चित्रपटाबद्दलची उत्सुकता अधिकच वाढली आहे. सुरुवातीला फक्त मुक्ता बर्वेचाच चेहरा समोर आल्यानंतर पडद्याआड असलेले चित्रपटातील इतर कलाकारही आता समोर आले आहेत.

आणखी वाचा : अँबर हर्डची ११६ कोटीची नुकसान भरपाई जॉनी डेप करणार माफ, पण ‘या’ अटीवर; वकिलांनी केला खुलासा

काही दिवसांपूर्वी ‘वाय’ या चित्रपटाचे एक टिझर प्रदर्शित झाला आहे. त्यात चित्रपटातील सर्व अभिनेत्रींचे दर्शन घडले होते. एकाच वेळी वेगवेगळ्या व्यक्तिरेखांच्या आयुष्यात घडणाऱ्या घडमोडींची एक धावती झलक यात दिसली होती. यात मुक्ता बर्वे व्यतिरिक्त प्राजक्ता माळी, रसिका चव्हाण प्रमुख भूमिकेत असल्याचे दिसून आले होते. या टिझरला प्रचंड प्रतिसाद मिळाल्यानंतर आता चित्रपटाचा दुसरा टिझर प्रदर्शित झाला आहे. ‘वाय ‘ चित्रपटाच्या या दुसऱ्या टिझर मधून चित्रपटातील अभिनेतेही आता प्रेक्षकांच्या समोर आले आहेत. यात नंदू माधव, संदीप पाठक, ओमकार गोवर्धन, सुहास शिरसाट, प्रदीप भोसले, रोहित कोकाटे, संदीप दंडवते हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ‘वाय’ मधील सर्व चेहरे आता गुलदस्त्याबाहेर आल्यामुळे १३ जून रोजी प्रदर्शित होणाऱ्या ट्रेलर बद्दल प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता लागून राहिली आहे.

आणखी वाचा : Kon Honar Crorepati 6 : “मी मराठीतून प्रश्न विचारणार”, हे ऐकताच काजोलन केले असे काही

आणखी वाचा : अक्षयला होती सासू डिंपल कपाडियासोबत डेटवर जाण्याची इच्छा, कारण…

कंट्रोल एन प्रॅाडक्शन निर्मित या चित्रपटाची पटकथा आणि संवाद अजित वाडीकर यांचेच आहेत. पटकथा व संवाद अजित वाडीकर, स्वप्नील सोज्वळ व संदीप दंडवते यांनी लिहिलेले आहेत. तर कार्यकारी निर्माते विराज विनय मुनोत आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-06-2022 at 17:45 IST