scorecardresearch

‘अजून एकदा म्हटलस तर…’, फोटोग्राफरनं ‘त्या’ नावानं हाक मारताच यामी गौतमचा चढला पारा

तिचा हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.

yami gautam, yami gautam video, bhoot police,
यामीचा लवकरच 'भूत पुलिस' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे यामी गौतम. काही दिवसांपूर्वीच यामीने लग्न केल्याचे समोर आले आहे. तिने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. करिअरच्या सुरुवातीला यामीने ‘फेअर अँड लव्हली’च्या जाहिरातीमध्ये काम केले होते. आता एका फोटोशूट दरम्यान फोटोग्राफरने तिला ‘फेअर अँड लव्हली’ या नावाने आवाज दिला आहे. ते ऐकून यामी संतापली आहे.

लवकरच यामी गौतमचा ‘भूत पुलिस’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ती सध्या या चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसत आहे. जुहूमध्ये चित्रपटाच्या प्रमोशनचा एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी फोटोग्राफर यामीचे फोटो काढत होते. दरम्यान एका फोटोग्राफरने यामीला ‘फेअर अँड लव्हली’ या नावाने आवज दिला. ते ऐकून यामीचा पारा चढतो आणि ते फोटोग्राफरला ‘अजून एकदा म्हटलस ना तर बघच.. आदराने बोल.. अशा प्रकारे आवाज देऊ नकोस’ असे म्हणत सुनावले आहे. सध्या यामीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bollywd Take (@bollywdtake)

‘भूत पोलीस’ हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटात सैफ अली खानसोबत अर्जुन कपूर, जॅकलिन फर्नांडिस आणि यामी गौतम हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. काही दिवसांपूर्वी चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. त्यानंतर चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. हा चित्रपट १० सप्टेंबर २०२१ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार होता. पण करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला. आता हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर १७ सप्टेंबर २०२१ रोजी प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-09-2021 at 19:21 IST
ताज्या बातम्या