बॉलिवूडमध्ये आणखी एका स्टारच्या मुलाची भर पडण्याची शक्यता आहे. हा आहे सुपरस्टार शाहरूख खानचा १७ वर्षाचा मुलगा आर्यन. एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार ‘यशराज फिल्म्स’चा सर्वेसर्वा आदित्य चोप्रा आपला घनिष्ठ मित्र शाहरूख खानच्या मुलाला ‘धूम ६’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये आणण्याची योजना बनवित आहे. याआधी शाहरूखने स्वत: ‘धूम’ चित्रपटाच्या मालिकेतील चित्रपटात काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. याआधी जॉन अब्राहम, आमीर खान आणि हृतिक रोशनसारख्या अभिनेत्यांनी ‘धूम’ चित्रपट मिलिकेतील चित्रपटांमधून खलनायकी बाजाची भूमिका उत्तमरित्या साकारली आहे. आगामी ‘धूम’ चित्रपटासाठी बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खानचे नाव माध्यामातून चर्चेत होते. असे असले तरी, धूम प्रकारातील ज्या चित्रपटात आर्यन काम करणार आहे, त्याला काही वर्षाचा अवधी लागू शकतो. सध्या आर्यन शिकत असून, प्रथम त्याने शिक्षण पूर्ण करावे आणि जेव्हा तो २१ वर्षाचा होईल, तेव्हा त्याने चित्रपटात काम करण्यास सुरुवात करावी अशी त्याच्या वडिलांची म्हणजेच शाहरूख खानची इच्छा आहे. सिनेअभिनेत्यांच्या मुलांनी चित्रपटसृष्टीत फार काही पराक्रम दाखविल्याचे पहावयास मिळत नाहीत. खास करून सुपरस्टारच्या मुलांच्याबाबतीत ही बाब प्रकर्षाने जाणवते. याबाबतीत आर्यन वेगळा ठरू शकतो का हे पाहाणे औत्सुक्याचे ठरेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yashraj to launch shah rukh khans son aryan in dhoom
First published on: 14-11-2014 at 02:03 IST