सरत्या वर्षांत मनोरंजन विश्वात बऱ्याच घडामोडी घडल्या. प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या घरातील पार्टीचा वाद असो किंवा मग ‘मणिकर्णिका’, ‘पानिपत’, ‘कबीर सिंग’ यांसारख्या चित्रपटांवरून निर्माण झालेला वाद, कलाविश्व नेहमीच चर्चेत राहिलं. बॉलिवूडसोबतच मराठी कलाविश्वातही बऱ्याच घडामोडी घडल्या. अभिनेत्री प्रिया बापटची पहिलीच वेब सीरिज आणि त्यात तिने दिलेला लेस्बियन किसिंग सीन, कर्करोगावर मात करत कलाविश्वात पुनरागमन करणारे शरद पोंक्षे, ‘रात्रीस खेळ चाले २’ मालिकेतील वच्छीचा अफलातून डान्स, अभिनेता सुमीत राघवन पालकांना केलेलं आवाहन यांसारखे व्हिडीओ ‘लोकसत्ता लाइव्ह’ या युट्यूब पेजवर चांगलेच गाजले.

१. Video : ‘मी असा लढलो’, शरद पोंक्षेंनी उलगडली कर्करोगासोबतची झुंज

२.पाहा ‘रात्रीस खेळ चाले २’मधल्या वच्छीचा अफलातून डान्स अन् त्यामागची कहाणी

३.City of Dreams : लेस्बियन सीन व्हायरल होणं हे माझं दुर्दैव- प्रिया बापट</strong>

४. ‘मुलांना मराठी माध्यमातूनच शिकवा’, सुमीतने केलं पालकांना आवाहन

५. राजकारणपासून ट्रोलिंगपर्यंत अनेक मुद्द्यांचा ‘धुरळा’

सरत्या वर्षात बॉलिवूड आणि मराठीतही दमदार चित्रपटांची निर्मिती झाली. मराठीत ‘आनंदी गोपाळ’, ‘ठाकरे’, ‘फत्तेशिकस्त’, ‘हिरकणी’, ‘खारी बिस्किट’, ‘कागर’ असे चांगले चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले.