सध्या संपूर्ण देश करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे त्रस्त आहे. त्यामुळे दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जाणारा कृष्ण जन्माष्टमी सण यावेळी अगदी साध्या पद्धतीने साजरा केला जात आहे. प्रत्येक जण घरी राहून आनंदात हा दिवस साजरा करत आहेत. दरम्यान प्रसिद्ध संगीतकार, गायक हनी सिंग याने देशवासीयांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
अवश्य पाहा – सुशांत मृत्यू प्रकरण: स्वरा भास्करचा रिया चक्रवर्तीला पाठिंबा
हनी सिंगने बालपणीचा एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये त्याने भगवान श्री कृष्ण यांच्यासारखी वेषभूषा परिधान केली आहे. या फोटोद्वारे त्याने देशवासीयांना कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
अवश्य पाहा – Video : मराठीतलं पहिलं देशभक्तीपर रँप साँग पाहिलं ‘का?’
श्रावण महिन्यात अनेक सण साजरे होतात, व्रत केली जातात. रिमझिम पावसाच्या धुंद मनमोहक वातावरणात आध्यात्मिक व धार्मिक परंपरांचा वारसा जोपासायचे काम श्रावण महिना करतो. श्रावणात येणाऱ्या अनेक सणांपकी सर्वाचा लाडका सण म्हणजे गोकुळाष्टमी, कृष्णजन्माचा दिवस. श्रावण महिन्याच्या वद्य अष्टमीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर श्रीकृष्णाचा जन्म झाला. कंसाच्या कडेकोट बंदिवासात देवकीने आपल्या आठव्या पुत्राला जन्म दिला. विष्णूच्या या आठव्या अवताराचे या दिवशी पृथ्वीवर दुर्जनांच्या नाशासाठी झालेले हे आगमन, म्हणून हा दिवस मोठय़ा भक्तिभावाने व जल्लोषात साजरा केला जातो.
