साहित्य अकादमीतर्फे मुंबईत दादर येथे २७ आणि २८ ऑक्टोबर रोजी युवा मराठी काव्योत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ कवी-साहित्यिक वसंत आबाजी डहाके यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या संमेलनात काव्यवाचन, चर्चा असे विविध कार्यक्रम होणार
आहेत.
मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय, साहित्य अकादमी, दादर (पूर्व) येथील अकादमीच्या सभागृहात होणाऱ्या संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ कवी वसंत पाटणकर यांच्या हस्ते होणार आहे. दोन दिवसांच्या काव्योत्सवात ‘कविता वाचन आणि कवितेविषयी भूमिका’ या विषयावर सतीश काळसेकर, गणेश विसपुते, नीरजा, प्रभा गणोरकर निळकंठ कदम यांच्या अध्यक्षतेखाली चर्चा होणार आहे.
काव्योत्सवाच्या निमित्ताने साहित्य अकादमीने प्रकाशित केलेल्या पुस्तकांचे प्रदर्शनही आयोजित करण्यात आले आहे. दोन्ही दिवसांचे कार्यक्रम सकाळी १०.३० ते दुपारी ४ या वेळेत होणार आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 20th Oct 2015 रोजी प्रकाशित
साहित्य अकादमीतर्फे दोन दिवसांचा युवा मराठी काव्योत्सव
साहित्य अकादमीतर्फे मुंबईत दादर येथे २७ आणि २८ ऑक्टोबर रोजी युवा मराठी काव्योत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे
Written by रोहित धामणस्कर
First published on: 20-10-2015 at 07:08 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yuva marathi kavya utsav