‘झी मराठी’ वाहिनी नेहमीच विविध विषयांवरील मालिका प्रेक्षकांसमोर सादर करताना दिसते. यानंतर आता झी मराठीवर लवकरच एक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘अप्पी आमची कलेक्टर’ असे या मालिकेचे नाव आहे. नुकतंच या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. सध्या या प्रोमोची सर्वत्र चर्चा असल्याचे पाहायला मिळत आहे.

झी मराठीवर नुकतंच ‘अप्पी आमची कलेक्टर’ या नव्या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. या मालिकेत अपर्णा माने (अप्पी) या भूमिकेतून नवोदित अभिनेत्री शिवानी नाईक पदार्पण करणार आहे. या मालिकेत एक वेगळा विषय समोर येणार आहे. अपर्णा सुरेश माने म्हणजे अप्पी, ही एका ग्रामीण भागातील खेडे गावात राहणारी मुलगी आहे. या गावात कोणत्याही शैक्षणिक सुविधा, कोणतेही मार्गदर्शन नसताना ती तिचे कलेक्टर होण्याचे स्वप्न कसे पूर्ण करते याचा संघर्ष यात पाहायला मिळणार आहे. यादरम्यान येणाऱ्या आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक अडचणींवर ती कशाप्रकारे मात करते हे देखील यात पाहायला मिळणार आहे.

प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारी नवी मराठी वेबसीरिज ‘साजिंदे’ प्रेक्षकांच्या भेटीला

या मालिकेतील आपल्या या भूमिकेबद्दल बोलताना शिवानी म्हणाली, “मी खूप भाग्यवान आहे की मला झी मराठीच्या मंचावर काम करण्याची संधी मिळतेय. एक नवीन जबरदस्त प्रेरणा असणारी आणि एक मोठी संकल्पना उराशी बाळगून अनेक अडचणींवर मात करत आपले ध्येय साध्य करणाऱ्या मुलीची भूमिका मला करायला मिळत आहे. याबद्दल मी खूप आनंदी आहे.

“मी एका ध्येयसमर्पित मुलीची भूमिका साकारणार आहे. ही अप्पी प्रेक्षकांना नक्कीच प्रेरणा देणारी ठरेल. याचा मला विश्वास आहे”, असेही शिवानीने म्हटलं. शिवानीने या आधी अनेक एकांकिका स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे.

“माझ्या वयाच्या तिसऱ्या वर्षी…”, गायक सलील कुलकर्णींनी सांगितली त्यांच्या आजोबांची खास आठवण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या मालिकेची निर्मिती वज्र प्रोडक्शनने केली आहे. या प्रोडक्शन हाऊसने या आधी झी मराठीवर ‘लागीर झालं जी, देवमाणूस, देवमाणूस २’ या मालिका केल्या आहेत. या तीनही मालिका चांगल्याच गाजल्या होत्या. त्यामुळे या मालिकेबद्दल उत्सुकता पाहायला मिळत आहे. येत्या २२ ऑगस्टपासून ही मालिका झी मराठीवर प्रदर्शित होत आहे.