झी मराठी वाहिनीवरील ‘तू तेव्हा तशी’ मालिका सध्या चांगलीच चर्चेत आहे. या मालिकेने सध्या प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. वयाची ३५शी ओलांडलेल्या जोडप्याची कथा या मालिकेमध्ये दाखवण्यात आली आहे. अनामिका-सौरभ या जोडप्याची ही कथा आहे. सध्या हे दोघं लग्नापूर्वी एका छताखालीच म्हणजे सौरभच्या घरी राहत आहेत. पण सौरभच्या घरी अनामिका राहायला आली असता नवनवीन वाद निर्माण होताना दिसत आहेत. अशातच आता मालिकेला एक वेगळं वळण मिळणार आहे.

आणखी वाचा – ‘लायगर’ सुपरफ्लॉप ठरला अन्…; हैद्राबादमधील चित्रपटगृहामध्ये पोहोचताच विजय देवरकोंडाचे डोळे पाणावले

Rohit Sharma Talking about his retirement in the Breakfast with Champions show
रोहित शर्मा कधी म्हणणार क्रिकेटला अलविदा? हिटमॅनने निवृत्तीबाबत केलं मोठं वक्तव्य
Shekhar Suman says Kangana Ranaut Adhyayan were happy together
“कंगना रणौत व माझा मुलगा एकत्र आनंदी होते,” अभिनेत्रीच्या एक्स बॉयफ्रेंडच्या वडिलांचं विधान; म्हणाले, “त्या दोघांच्याही…”
IPL 2024 Gujarat Titans vs Punjab Kings Match Updates in Marathi
IPL 2024: मुंबईकर शशांक ठरतोय पंजाब किंग्जचा तारणहार, जाणून घ्या त्याची आजवरची वाटचाल
Aarti Singh To Marry Boyfriend Deepak Chauhan
प्रसिद्ध अभिनेत्री ३९ व्या वर्षी करतेय अरेंज मॅरेज, नवी मुंबईचा आहे होणारा पती; म्हणाली, “माझ्या आयुष्यात…”

स्वप्निल जोशी आणि शिल्पा तुळसकर यांनी या मालिकेमध्ये सौरभ आणि अनामिकाची भूमिका साकारली आहे. सौरभ अविवाहित तर अनामिका विवाहित आहेत. मात्र अनामिकाचा नवरा तिला सोडून गेला अन् मालिकेच्या सुरुवातीपासूनच तिचा पहिला नवरा कोण? हे दाखवण्यात आलं नाही. फक्त अनामिकाच्या पहिल्या नवऱ्याच्या नावाचा उल्लेख मालिकेमध्ये करण्यात आला.

आता तिचा पहिला नवरा आकाश जोशी सौरभच्या थेट घरी येणार आहे. झी मराठी वाहिनीने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटद्वारे याचा प्रोमो देखील प्रदर्शित केला आहे. आकाश जोशी थेट सौरभला भेटण्यासाठी त्याच्या घरी येतो आणि त्यानंतर नेमकं काय घडतं? हे पाहणं रंजक ठरणार आहे. आकाश जोशी या पात्रासाठी मराठीसह हिंदी चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्याची निवड करण्यात आली आहे.

आणखी वाचा – ‘लाल सिंग चड्ढा’ सुपरफ्लॉप ठरल्यानंतर आमिर खानचा सर्वात मोठा निर्णय, निर्मात्यांचाही विचार केला अन्…

अभिनेता अशोक समर्थ हा आकाश जोशीची भूमिका साकारताना दिसेल. ‘सिंघम’ चित्रपटामुळे अशोक समर्थच्या चाहत्यावर्गामध्ये अधिक वाढ झाली. काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या ‘दगडी चाळ २’ चित्रपटामध्येही अशोक समर्थने महत्त्वाची भूमिका साकारली. आता या मालिकेमधील त्याची नकारात्मक भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडणार का? हे पाहावं लागेल.