scorecardresearch

वयाने १० वर्ष मोठ्या अभिनेत्रीसोबत ‘बिग बॉस ओटीटी’चा स्पर्धक आहे रिलेशनशिपमध्ये

सोशल मी़डियावर पोस्ट शेअर करत झीशानने त्याच्या रिलेशनशिपविषयी खुलासा केला आहे.

zeeshan khan, reyhna pandit,
सोशल मी़डियावर पोस्ट शेअर करत झीशानने त्याच्या रिलेशनशिपविषयी खुलासा केला आहे.

अभिनेता झीशान खानने कुमकुम भाग्य मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले. झीशानला खरी ओळख ही बिग बॉस ओटीटी या शोमधून मिळाली. झीशानने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्याच्या रिलेशनशिप विषयी खुलासा केला आहे. त्याच्या गर्लफ्रेंडसोबत फोटो शेअर करत त्याने त्याच्या नात्याची कबुली दिली आहे. झीशान हा ‘कुमकुम भाग्य’ मालिकेतील सह-कलाकार रेहाना पंडितसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. यावेळी सगळ्यांचे लक्ष हे त्या दोघांच्या वय़ात असलेल्य़ा फरकाकडे गेले आहेत.

झीशानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या फोटोत झीशान आणि त्याची गर्लफ्रेंड रेहाना पंडित दिसत आहे. त्यांचा हा लिपलॉकचा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा फोटो शेअर करत, “माझ्या सगळ्यात जवळच्या मैत्रिणीपासून माझ्या आयुष्याच्या प्रेमापर्यंत, माझ्या आनंदापासून माझ्या मनःशांतीपर्यंत, मी जे काही मागितले ते तूच आहेस. प्रत्येक सेकंद जो मी तुझ्यासोबत घालवतो, प्रत्येक श्वास मी तुझ्या समोर घेतो… माझे हृदय प्रेमाने भरते. असे वर्णन हे फक्त पऱीच्य़ा कथेत पाहायला मिळते. मला असे लोक माहित आहेत ज्यांच्या मनात शंका असेल आणि त्यांना वाटेल की असे प्रेम खरे असू शकत नाही. पण नसलेल्या गोष्टींवर लोकांचा विश्वास नसतो. मला आशा आहे आणि अशा प्रकारचे प्रेम सगळ्य़ांना मिळाले पाहिजे. तू माझी आहेस आणि मी संपूर्ण जगाला आणि सगळ्य़ांना सांगत आहे की तू माझी आहेस,” अशा आशयाचे कॅप्शन झीशानने त्या पोस्टला दिले आहे.

आणखी वाचा : NCB च्या कोठडीत असणाऱ्या आर्यनसाठी McD चे बर्गर घेऊन पोहोचली गौरी खान पण…

आणखी वाचा : आर्यनची केस लढणारे सतीश मानेशिंदे एका दिवसासाठी घेतायत इतकी फी…

रेहानाने सोशल मी़डियावर तिच्या रिलेशनशिपविषयी कोणतीही पोस्ट केली नाही. मात्र, रेहानाने झीशानच्या पोस्टवर कमेंट केली आहे. ‘आय लव्ह यू जान’. तिने लिहिले की, ‘आपल्या दोघांचे प्रेम नेहमीच राहील,’ असे रेहाना त्या पोस्टवर कमेंट करत म्हणाली.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-10-2021 at 11:35 IST

संबंधित बातम्या