आपण एकमेकांना खूप आधीपासून ओळखत असतो, आपली छान गट्टी जमलेली असते आणि मैत्रिच्या नात्याचं मग पुढे प्रेमात रुपांतर होतं, प्रत्येक वेळी प्रेमाचा हाच मार्ग असेल असं नसतं ना. माझ्याही बाबतीत अगदी तसंच घडलं. दोघांची ओळख वगैरे काहीच नाही. मी कॉलेजला जात होते. मैत्रिणीचा वाढदिवस होता. आम्ही ठरवल्याप्रमाणे छान कल्ला करणार होतो. पण मी नेहमीप्रमाणे उशीरा निघाले. त्यात बसटॉपवर बराच वेळ उभे होते आणि त्यात अगं कुठे आहेस गं? इतका का उशीर तुला? कधी पोहोचशील आम्ही वाट पाहातोय? कसं होणार तुझं? वगैरे वगैरे असे एकामागोमाग एक फोन सुरू होते. मी येतेय… इथेच आहे… जरा ट्रॅफिक लागलंय… पोहोचतेच आहे. तुम्ही मी आल्याशिवाय केक कापू नका… असं सगळं माझं ‘कारणे द्या’ सुरू होतं.

बसने दहा-पंधरा मिनिटं वाट पाहायला लावली. बसमध्ये तशी घाईघाईतच चढले आणि मिळेल त्या सीटवर जाऊन ताडकन बसले… कारण पुढच्या सिग्नलनंतरच्या स्टॉपवर बस बऱ्यापैकी फुल्ल होणार, हे माहिती होतं. त्यामुळे खांद्याला लावलेली बॅग काढून ती मांडीवर ठेवून पटकन सीट पकडली. कंडक्टर आले तसे मी माझा पास काढून त्यांच्यापुढे केला. त्यांनी पास मशिनवर तो दोनदा चेक केला. मनात धडधड वाढू लागली आणि मोबाईलमध्ये पटकन तारीख चेक केली.

maintaining weight will be a challenge for next four months says vinesh phogat
आता वजन राखण्याचे आव्हान – विनेश फोगट
investor anthony bolton marathi
बाजारातली माणसं : प्रवाहाविरुद्ध जाणारा निधी व्यवस्थापक – अँथनी बोल्टन
in Nagpur, Attempted Gang Rape, Raises Concerns, Women Safety, Attempted Gang Rapein Nagpur, crime in nagpur, nagpur crime, police, nagpur news, marathi news,
गृहमंत्र्यांच्या गृहशहरात महिला असुरक्षित? भरदुपारी गँगरेपचा प्रयत्न
india bloc, india bloc rally
जागावाटपावरून मतभेद, तरीही व्यासपीठावर एकत्र; ‘इंडिया’ आघाडीकडून एकजूट दाखवण्याचा प्रयत्न?

इतक्यात… “अगं पोरी, पास संपलाय तुझा”, असा आवाज कंडक्टर काकांनी दिला. मला तारीख पाहून आपण पास रिन्यू करायला विसरलो असल्याचं नुकतच कळलं होतं.

“अरे, हो विसरलेच मी”, म्हणत थांबा मी तिकीट काढते, असं सांगून पर्समधून पैसे काढले.

माझा दिवसंच वाईट आहे, असं फिल व्हायला सुरूवात झाली होती, कारण तीन रुपये सुटे नसल्याचा प्रश्न आता निर्माण झाला होता. त्यात मैत्रिणींचे सारखे वाजणारे फोन… खरंच वैताग होत होता. मी काही बोलावं… इतक्यात थांबा काका हे घ्या तीन रुपये… असं म्हणत बाजूच्या सीटवर बसलेल्या एका मुलाने पैसे देऊ केले… मी त्याला नको म्हणण्यासाठी त्याच्याकडं पाहिलं आणि का ते माहिती नाही, पण त्याच्याकडं पाहिल्यानंतर एक वेगळंच फिलींग येऊन गेलं. तरीही मी पटकन सावरून त्याला नको, असं म्हटलंच… त्याने राहू देत गं… तीन रुपये तर आहेत. नंतर बघू. असं म्हणत कंडक्टर काकांच्या हातात पैसे दिले. मी तिकीट घेतले आणि त्याला थँक्यू म्हटलं. माझं लक्ष थेट त्याच्या डोळ्यांकडेच जात होतं. it’s ok म्हणून तो छान हसला… मला खूप भारी वाटत होतं. त्यानं माझ्याशी बोलावं असं थोड्या वेळानं वाटू लागलं होतं.

पण मीच सुरूवात केली… तू नेहमी याच बसने जातोस का? पैसे परत करता येतील या कारणाने विचारून पाहिलं. तो हो म्हणाला. मग मी उद्या तुझे पैसे परत करेन, असं सांगितलं. “चालतं ग.. इतकी काय फॉर्मेलिटी घेऊन बसलीस… असं म्हणतं त्याने विषय संपवला. मी फक्त हसले. माझ्या स्टॉपच्या आधीच तो निघण्यासाठी उठला… “चलो, मी निघतो”, मी त्याला बाहेर जाण्यासाठी जागा करून दिली. निघणार इतक्यात त्याने… “बाय द वे आयएम निखिल”, अशी ओळख करून दिली. मी ही हात मिळवला… फक्त हात मिळवला. नाव सांगायचं राहूनच गेलं. त्यानं थांबून… हं म्हटलं आणि मला कळलं.. ‘अरे हो… सॉरी मी सुजाता’, अशी ओळख करून दिली. मग पुन्हा भेटू… असं म्हणत तो बसमधून उतरण्यासाठी पुढे उभा राहिला. मी अजूनही अधूनमधून त्याच्याकडं बघत होते… पण तो पाठमोरा उभा होता. नंतर माझं लक्षच हटेना… त्याच्याही मनात काहीतरी सुरू होतं, असं मला सारखं वाटत होतं. स्टॉपजवळ थांबण्यासाठी बस स्लो झाली आणि तो उतरण्यासाठी पुढे गेला. माझं त्याच्याकडेच लक्ष होतं आणि उतरताना त्याने मागे वळून पाहिलं…त्याच्या चेहऱ्यावर हसू होतं… तो बाय असं पुटपुटला… माझ्याही चेहऱ्यावर हसू उमटलं होतं… ते त्यालाही कळलं होतं. तो पाहातच होता. उतरल्यानंतरही.

पुढे मग माझा स्टॉप येईपर्यंत मी… खिडकीतून बाहेर पाहात स्वत:ला गुंतवण्याचा प्रयत्न करत होते. पण सारखं राहूनराहून तोच समोर येत होता. ज्या ठिकाणी तो उभा होता… तिथंच सारखं लक्ष जात होतं… आमच्यात थोडक्यात फक्त ओळखीपुरतं झालेला संवाद सारखा आठवत होता. त्याचही माझ्यासारखंच असंच होत असणार, असंही वाटत होतं. काहीच कळेना… खरंच मी ब्लँक झाले होते. या काळात मैत्रिणींचे तीन मिस्डकॉल आले होते, पण मी उचलेले नव्हते. फोन आलेलंही मला कळलं नव्हतं. पुढचा संपूर्ण दिवस मी माझ्यातच होते… शांत. मी रोज वागते तशी त्या दिवशी नव्हते… मैत्रिणींनीही मला त्याची जाणीव करून दिली. मी काहीच नाही म्हणून त्यांना टाळलं.

मी आता त्याच्याच बद्दल विचार करू लागले होते. तो फॉर्मल कपड्यांमध्ये होता, बॅगही होती. म्हणजे तो जॉबला जात असणार… असे अंदाज बांधणे सुरू केले. इतकंच काय… कॉलेजच्या कँटिनमध्ये बसून फेसबुकवर निखिल नावाने… शोधाशोध सुरू केली. अडनाव माहिती नसल्यानं कठीण जात होतं. निखिल नावाचे जेवढे ऑप्शन आले ते सर्व पडताळून पाहिले पण तो सापडला नाही. मग निखील विलेपार्ले असं… स्पेसिफिक सर्च करून शोधण्याचा नालायकपणा देखील केला. पण त्यातही अपयश. दुसऱया दिवशी तीन रुपये परत करण्याच्या इराद्याने तिच बस गाठायची असं ठरवलं. अगदी काटेकोरपणे त्या दिवशी निघाले… म्हणजे काल किती वाजले होते बस पकडण्यासाठी वगैरे वगैरे… असं सगळं वेळेचं गणित करून निघाले होते. स्टॉपवर पोहोचले आणि पाच मिनिटांची वाट पाहिल्यानंतर ती बस दुरून दिसली. स्टॉपवर येऊन थांबली… बसमध्ये चढतानाच माझी धडधड वाढू लागली होती. मी चढले आणि ज्या सीटवर आम्ही बसलो होतो… तिथेच माझी नजर गेली. अचानक मन निराश झाले… सीट रिकामी होती. मग संपूर्ण बसमध्ये नकळत नजर फिरवली. पण तो कुठेच नव्हता… त्याच निराश मनाने पुढे जाऊन मी त्याच रिकाम्या सीटवर जाऊन बसले. पुन्हा तो काल बसमधून उतरण्यासाठी ज्या ठिकाणी उभा होता त्याच ठिकाणी राहूनराहून लक्ष जात होतं. मी इअरफोन्सकाढून मोबाईलवर गाणी ऐकत बसले. स्वत:ला बिझी ठेवू लागले. त्याचा स्टॉप आला… मी खिडकीबाहेर पाहिलं… उगाच शोधाशोध देखील केली. पुढे मग माझा स्टॉप आला… मी उतरले. पुढचा संपूर्ण दिवस निराश होते. दुसऱ्या दिवशी पुन्हा तिच बस पकडली… अजूनही माझं मनं त्यातच होतं. दुसऱ्या दिवशी त्या सीटवर आधीच दुसरं कुणीतरी बसलं होतं. पण तो नव्हता. हे असं पुढचे बरेच दिवस सुरु होतं… दोन आठवडे…. मी असं नक्की का वागत होते. काहीच कळत नव्हतं. मी त्याला खूप आधीपासून ओळखत होते असंही काहीच नव्हतं… पण तरीही मला रुखरुख लागली होती. माझ्या मनाची खूप चलबिचल झाली. कशातच लक्ष लागत नव्हतं. त्याची भेट होऊ शकत नसल्यानं मी आणखी गुंतू लागले तर नाही ना? मी प्रेमात नाहीये ना? असंही अनेकदा मनाला विचारून पाहण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. नाही, असं काही नाहीये… म्हणत मनाची समजूत काढली. पण तरीही रोज त्याच सीटकडे नजर जात होती. त्याची काही भेट होऊ शकली नाही… आपलं हे ‘किस्मत कनेक्शन’ इथेच ब्रेक होणार असं वाटू लागलं…
मग एक दिवस…
क्रमश:
– तीन फुल्या, तीन बदाम

 

© सर्व हक्क सुरक्षित