लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : गेल्या सहा महिन्यांत मुंबईत आगमन झालेल्या एक हजार ४८० प्रवाशांना करोनाची बाधा झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रशासनाने विविध ठिकाणांवरून येणाऱ्या प्रवाशांसाठी ६ सप्टेंबरपासून आरटीपीसीआर सुविधा उपलब्ध केली आहे. त्यात ही माहिती समोर आली.

आरटीपीसीआरद्वारे करोनाचे निदान के ले जाते. यासाठी प्रयोगशाळेची आवश्यकता असते. त्याप्रमाणे विमानतळावर सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. आतापर्यंत सहा महिन्यात दोन लाख २० हजार प्रवाशांची करोना चाचणी करण्यात आली. फे ब्रुवारी महिन्यात येणाऱ्या प्रवाशांचा ओघ जास्तच होता. या महिन्यात ८० हजार ९२३ प्रवाशांची चाचणी करण्यात आली. सप्टेंबर २०२० मध्ये चाचणीचा हाच आकडा १,७७६ होता. १९ ऑक्टोबपर्यंत ३,३४० प्रवाशांची चाचणी के ल्यानंतर त्यापैकी ३८ प्रवासी करोनाबाधित असल्याचे आढळले होते. गेल्या सहा महिन्यात झालेल्या चाचणीत १ हजार ४८० प्रवासी करोनाबाधित झाल्याची माहिती विमानतळ प्रशासनाने दिली आहे. मुंबई विमानतळावर सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या चाचणीसाठी ३० के ंद्र आहे. यात १३ मिनिटात चाचणीचा अहवाल दिला जात आहे.