चोवीस तासांत ५१८५ बाधित

राज्यातील ९ जिल्ह््यांना संसर्गझळा

ठाण्यातही चिंताजनक स्थिती

देशात दहा जिल्ह््यांंमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णवाढ होत असून, त्यातील नऊ जिल्हे महाराष्ट्रातील आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्णवाढ चिंताजनक असल्याचे निरीक्षण केंद्राने नोंदवले. तर मुंबईमध्ये बुधवारी सर्वाधिक ५१८५ नवे रुग्ण आढळले. ठाणे जिल्ह््यात २ हजार ८६९ इतक्या रुग्णांची नोंद झाल्यामुळे भीती वाढली आहे.

मुंबई पालिकेने चाचण्यांची संख्या वाढविण्यावर भर दिला असून येत्या काही दिवसांत रुग्णसंख्येचा आलेख चढाच राहणार असल्याची भीती पालिका अधिकाºयांनी व्यक्त के ली. पण या सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे मतही अधिकाºयांनी व्यक्त के ले आहे.

देशात सर्वाधिक रुग्णवाढ होत असलेल्या पहिल्या दहा जिल्ह््यांंमध्ये पुणे, नागपूर, मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नांदेड, अकोला, जळगाव यांचा समावेश आहे. कर्नाटकमधील बेंगळूरु शहराचाही या दहा जिल्ह््यांंमध्ये समावेश असून, त्यात  बहुतांश उपचाराधीन रुग्ण आहेत, असे केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितले. पंजाबमधील रुग्णवाढीबद्दलही राजेश भूषण यांनी चिंता व्यक्त केली. देशात करोनाचे नवे प्रकार आढळले असले तरी केवळ त्यामुळेच रुग्णसंख्या वाढत आहे, हे अद्याप तरी निष्पन्न झालेले नाही.

देशातील करोनाबळींपैकी ८८ टक्के मृत्यू हे ४५ वर्षांवरील व्यक्तींचे आहेत. या वयोगटातील मृतांचे प्रमाण हे सरासरीपेक्षा (१.३७ टक्के) अधिक म्हणजे २.८५ टक्के असल्याने या वयोगटातील व्यक्तींना प्राधान्याने लशीद्वारे करोनापासून संरक्षण देण्यात येत असल्याचे राजेश भूषण यांनी स्पष्ट केले.

दिवसभरात ३१,८५५ नवे रुग्ण

राज्यात बुधवारी करोना रुग्णवाढीने नवा उच्चांक नोंदवला. गेल्या २४ तासांत राज्यात ३१,८५५ रुग्ण आढळले. मुंबईतही दिवसभरात पाच हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळले. पुणे ३५६६, नागपूर जिल्हा ३७५०, पिंपरी-चिंचवड १८२८, उर्वरित पुणे जिल्हा १३६०, नाशिक जिल्हा १६१९, जळगाव जिल्हा ९१५, नंदुरबार जिल्हा ४९८, औरंगाबाद जिल्हा १४५१, नांदेड शहर ६५०, यवतमाळ ४७० रुग्ण आढळले.

लोणावळा, खंडाळ्यात पर्यटकांवर निर्बंध…

पुणे : करोना संसर्ग वाढत असल्यामुळे सार्वजनिक ठिकाणी होळी आणि धुळवडीस जिल्हा प्रशासनाने मनाई के ली आहे. त्यामुळे यंदा लोणावळा, खंडाळा, पानशेत, खडकवासला धरण परिसर आणि जिल्ह््यातील अन्य पर्यटनस्थळी हा उत्सव साजरा करता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

दुहेरी उत्परिवर्तनाचा विषाणू

दुहेरी उत्परिवर्तने असलेला विषाणू भारतातील काही नमुन्यांमध्ये आढळला आहे. रुग्णांच्या नमुन्यांच्या जनुकीय क्रमनिर्धारणावेळी इतरही अनेक गंभीर स्वरूपाचे विषाणू देशात आढळले आहेत. देशातील १८ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये ७७१ उत्परिवर्तने आढळली आहेत. त्यातील ७३६ नमुन्यांमध्ये ब्रिटनचा नवकरोना आढळला, असे ‘एनसीडीसी’चे संचालक एस. के. सिंग यांनी सांगितले. पान ५

होळीसाठी नियमावली…

मुंबई : करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यंदा होळीचा सण रंगांची उधळण न करता साजरा करावा, असे आवाहन राज्य सरकारने केले आहे. सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यास गृह विभागाने बंदी घातली असून, कोकणात घरोघरी पालखी नेण्यास मनाई करण्यात आली आहे.  होळी व धूलिवंदन या उत्सवाच्या ठिकाणी धार्मिक वा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यासही मज्जाव करण्यात आला आहे. पाण्याचा अपव्यय टाळण्यात यावा. सार्वजनिक ठिकाणी किंवा रस्त्यावर मोठया संख्येने एकत्र येणे अथवा गर्दी करणे टाळावे. कोणत्याही प्रकारे गर्दी आकर्षित होणार नाही, अशा कार्यक्रमाचे किंवा मिरवणुकांचे आयोजन करण्यात येऊ  नये, असे आदेश ठाणे पालिकेनेही दिले आहेत.

कठोर निर्बंधांचे सरकारचे संकेत

मुंबई : राज्यातील करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता पुन्हा टाळेबंदी लागू करायची की निर्बंध अधिक कठोर करायचे, असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत के ला. टाळेबंदी लागू करायची का, यावर बैठकीत बराच खल झाला. राज्यात रुग्णवाढीचा कल असाच राहिल्यास टाळेबंदीशिवाय पर्याय नाही, असे स्पष्ट करण्यात आले. मात्र, सध्या टाळेबंदीऐवजी लागू असलेले निर्बंध अधिक कठोर करण्यात यावेत, अशी सूचना काही मंत्र्यांकडून करण्यात आली. त्यामुळे तूर्त तरी पुन्हा टाळेबंदी लागू न करता निर्बंध अधिक कठोर करण्याचे संके त देण्यात आले.

‘मॉल’मध्ये प्रतिजन चाचणी

ठाणे : मॉलमध्ये प्रवेशासाठी शीघ्र प्रतिजन चाचणी सक्तीची करण्याचा निर्णय ठाणे पालिकेने बुधवारी घेतला. या चाचणीमध्ये नकारात्मक अहवाल आलेल्या व्यक्तींनाच मॉलमध्ये प्रवेश दिला जाणार असून या निर्णयाची अंमलबजावणी, गुरुवारपासून होणार आहे.