22 September 2020

News Flash

अभिषेक बच्चन करोना निगेटिव्ह; रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

ट्विट करत मानले चाहत्यांचे आभार

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन याची करोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. मुंबईतील नानावटी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु होते. अखेर अभिषेकने करोनावर यशस्वीरित्या मात केली असून त्याला रुग्णालायतून डिस्चार्ज देण्यात आला आहे. अभिषेकने ट्विट करत ही माहिती दिली आहे.

करोनाची लागण झाल्यानंतर अभिषेकवर नानावटी रुग्णालयात उपचार सुरु होते. अखेर २८ दिवस उपचार घेतल्यानंतर त्याचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. अभिषेकने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती चाहत्यांना दिली असून त्यांचे आभार मानले आहेत.

“एक वचन हे एक वचनच असतं. आज माझी करोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. मी तुम्हा सगळ्यांना सांगितलं होतं मी करोनावर मात करेन. तुम्ही सगळ्यांनी माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबीयांची केलेल्या काळजीसाठी मनापासून धन्यवाद. नानावटी रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका यांनी माझ्यासाठी जे काही केलं त्यासाठी मनापासून त्यांचे आभार”, असं ट्विट अभिषेकने केलं आहे.

दरम्यान, अभिनेता अमिताभ बच्चन यांना करोनाची लागण झाल्यानंतर कुटुंबातील अन्य सदस्यांनाही करोनाची लागण झाली होती. बिग बी आणि अभिषेक यांना करोनाची लागण झाल्याचं लक्षात येताच ते ११ जुलै रोजी नानावटी रुग्णालयात भरती झाली होते. मात्र अखेर बिग बींसह अभिषेकनेदेखील करोनावर मात केली आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 8, 2020 2:55 pm

Web Title: abhishek bachchan tests negative for covid 19 gets discharged from hospital ssj 93
Next Stories
1 Coronavirus : आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांना विनामूल्य प्रशिक्षण
2 गणपती बाप्पा मोरया…कोकणात जाणाऱ्यांसाठी मनसेची विशेष बससेवा
3 राज्यातील ग्रामीण भागांमधील करोना प्रादुर्भाव चिंताजनक
Just Now!
X