मुंबईचा दहावीचा निकाल टक्क्य़ाने घसरला तरी..

राज्य मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. मुंबई विभागाचा निकाल गेल्या वर्षीच्या तुलनेत एक टक्क्याने घसरला असला तरी गुणांचा फुगवटा असल्याने महाविद्यालयांचे कट ऑफ गुण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे

नामांकित महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी चढाओढ होणार आहे. विभागाचा निकाल यावर्षी ९१.९० टक्के इतका लागला आहे. या विभागातून एकूण ३ लाख २३ हजार ९५५ विद्यार्थी बसले होते, त्यापैकी २ लाख ९७ हजार ७१९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

विभागात प्रावीण्यासह प्रथम श्रेणी म्हणजे ७५ टक्क्यांहून अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ८५,१२३ इतकी आहे, तर ६० ते ७४.९९ टक्के गुण मिळवून प्रथम श्रेणी मिळवणाऱ्यांची संख्या १,०९,४७३ इतकी आहे. द्वितीय श्रेणी मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ८३,१५८ इतकी, तर उत्तीर्ण श्रेणी मिळवणाऱ्यांची संख्या १९,९६५ इतकी आहे. यात प्रथम श्रेणीपेक्षा जास्त गुण असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्याने प्रवेशासाठी चांगलीच चढाओढ होणार आहे. विशेषत: विज्ञान शाखेसाठी आणि नामांकित महाविद्यालयांसाठी ही चढाओढ पाहावयास मिळणार आहे.

विभागवार निकाल विभागाचे नाव आणि कंसात निकालाची टक्केवारी

कोकण (९६.५६), कोल्हापूर (९३.८९), पुणे (९३.३०), मुंबई (९१.९०), नाशिक (८९.६१), औरंगाबाद (८८.०५), नागपूर (८५.३४), अमरावती (८४.९९),  लातूर (८१.५४)

मुंबई विभागातून मुंबई

उपनगराचा निकाल ९३.२७ टक्के लागला आहे. तर त्यापाठोपाठ मुंबई शहर उपविभागाचा निकाल ८२.७४ टक्के लागला. तर ठाणे उपविभागाचा निकाल ९१.४२ टक्के इतका लागला आहे.  पालघर उपविभागाचा निकाल ९२.७४ टक्के  लागला आहे.

रायगड उपविभागाचा निकाल ९१.१२ टक्के इतका लागला आहे.

निकाल दृष्टिक्षेपात

  •  परीक्षेला बसलेले नियमित विद्यार्थी – १६,१,४०६
  • उत्तीर्ण विद्यार्थी – १४,३४१४३. निकालाची टक्केवारी – ८९.५६
  • मुलींचा निकाल – ९१.४१ तर मुलांचा निकाल – ८७.९८ टक्के
  • पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी – १ लाख १८ हजार ६४१
  • पुनर्परीक्षार्थीचा निकाल – ४३.५७ टक्के.  अपंग विद्यार्थ्यांचा निकाल – ८८.७३ टक्के
  • रात्र शाळांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा निकाल – ६३.६८ टक्के
  • बाहेरून परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांचा निकाल – ४७.९१ टक्के