News Flash

‘Ambassadors of Mumbai’ व्हायचंय? खाकी टूर्स देत आहे संधी

आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे टूर गाइड व्हायचंय? या कार्यक्रमातून मिळणार संधी

मुंबईतील ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या वास्तू आणि शहराचा फारसा माहित नसलेला इतिहास सर्वसामान्यांपर्यंत पोहचावा यासाठी ‘खाकी टूर्स’ २०१५ पासून विविध टूर्सचे आयोजन करत आहेत. या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे ही सहल सामान्य टूरिस्ट गाइड नाही तर खास प्रशिक्षण घेतलेले ‘Ambassadors of Mumbai’ घडवतात. अशा इच्छुक मुंबई प्रेमींसाठी ‘Ambassadors of Mumbai’ बनण्याची संधी खाकी टूर्सकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे.

‘मुंबईचे अ‍ॅम्बेसेडर’ होण्यासाठी एक सखोल प्रशिक्षण कार्यक्रम खाकी टूर्स राबवते. यात शहराचा इतिहास, भूगोल, भूशास्त्र, आर्किटेक्चर, निसर्ग आणि संस्कृतीचे विविध पैलू – धर्म, जेवण, कला आणि बऱ्याच गोष्टींचे प्रशिक्षण या टूरमध्ये दिले जाते. प्रत्येक व्यक्तीला गोष्ट कशी सांगायची, कसे बोलायचे आणि कोणत्याही समस्येचे निवारण कशा पद्धतीने केले पाहिजे याचे मार्गदर्शन केले जाते.

‘खाकी टूर्स’चे संस्थापक भरत गोठोसकर यांनी या टूर बद्दल सांगितले की, “या प्रशिक्षण कार्यक्रमाचे हे ४ थे वर्ष आहे, आणि प्रत्येक वर्षी या उपक्रमामध्ये सहभागी होणाऱ्या मुंबई प्रेमींची संख्या वाढत आहे. गेल्या वर्षी १५० पेक्षा जास्त उमेदवारांनी या उपक्रमात सहभागी होण्याची इच्छा दर्शवली होती. त्यापैकी ३५ उमेदवारांची या प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली. आणि त्यापैकी आठ उमेदवार हे ‘मुंबईचे अ‍ॅम्बेसेडर’ झाले. येणाऱ्या पर्यटकांसाठी योग्य लोकांनी शहराचे प्रतिनिधित्व केले पाहिजे याचा आम्ही प्रयत्न करतो.”

मुंबईचा अँबेसेडर होण्यासाठी काय करायचं?

‘द अ‍ॅम्बेसेडर ऑफ मुंबई’ उपक्रम १ मे २०२१ ते ३१ ऑगस्ट २०२१ या कालावधीत होणार आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता. अर्ज देण्याची शेवटची तारीख ही २५ एप्रिल २०२१ आहे. करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे, प्रशिक्षणाची सत्रे ही ऑनलाइन असतील आणि प्रात्यक्षिके लॉकडाउनचे निर्बंध हटवल्यानंतर सुरु होतील. इच्छुक उमेदवार www.khakitours.com या वेबसाईटला भेट देऊन अर्ज देऊ शकतात.

खाकी टूर्स नक्की काय करते?

KHAKI चा अर्थ हा Keeping Heritage Alive and Kicking in India, ‘खाकी टुर्स’चे संस्थापक भरत गोठोस्कर यांनी मुंबईकरांना आपल्या आजुबाजूला असलेल्या गोष्टींचा इतिहास आणि वारसा याची जाणीव व्हावी यासाठी २०१५ मध्ये ‘खाकी टूर्स’ची स्थापना केली, यासाठी त्यांनी ‘हेरिटेज वॉक’ ची संकल्पना राबवली. त्यात लोकांचा वाढता प्रतिसाद आणि मागणी पाहता त्यांनी २०१६ मध्ये खाजगी टूर्स घेण्यास सुरूवात केली.

‘लोकसत्ता ऑनलाइन’च्या ‘गोष्ट मुंबईची’ या व्हिडीओ सीरिजच्या माध्यमातून मुंबईचा रंजक इतिहास दर्शकांपुढे आणण्यात खाकी टूर्स मोलाची भूमिका बजावत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2021 11:39 am

Web Title: ambassador of mumbai khaki tours training program
Next Stories
1 सुप्रीम कोर्टाने अनिल देशमुखांना झटका दिल्यानंतर सीबीआय तपासाला वेग; टीम NIA कार्यालयात दाखल
2 रेमडेसिवीरचे उत्पादन दुप्पट आणि ‘एमआरपी’ कमी करा
3 करोनानिर्बंधांविरोधात हॉटेलचालकांचे राज्यव्यापी आंदोलन
Just Now!
X