कला वक्तृत्वाची; अशोक दा. रानडे

भाषणक्रियेवर ज्यांचा प्रत्यक्ष परिणाम होतो, प्रभाव पडतो अशा ज्या काही बाबी आहेत त्यात हातवारे आणि हावभाव यांचा निर्विवादपणे अंतर्भाव होतो. हालचाल, हातवारे आणि हावभाव यांच्यामुळे भाषणाचे हेल निश्चित होतात. हाताच्या चलनवलनांचे मानवी जीवनात खास महत्त्व आहे. भाषणासमवेत हातवारे होतात. तसेच हावभावही होतात. खरे पाहता हावभाव हा जोडशब्द मानायला हवा.

lokrang article, Maharshi Vitthal Ramji Shinde, maharshi shinde centenary golden jubilee year, prarthana samaj, centenary golden jubilee year, bramho samaj, depressed classes mission society, Asprushata Niwaran Parishad, Bhartiya Asprushyatecha Prashna, work for depressed class, maharshi vitthal ramji shinde, 23 april 2024, reformer,
निमित्त : समर्पित समाजसुधारक
sanjay ruat and shrikant shinde
श्रीकांत शिंदे फाऊंडेशनमध्ये गैरव्यवहार? संजय राऊतांची थेट मोदींकडे तक्रार; म्हणाले, “बिदागीच्या रकमा…”
Make Home Made Gudi Padwa special Instant Sevai Kheer Note the Tasty Recipe
गुढीपाडव्या निमित्त बनवा स्पेशल स्वादिष्ट ‘शेवयाची खीर’ ; नोट करा रेसिपी
sharad pawar, madha lok sabha constituency, ncp, bjp
माढ्यात शरद पवारांची भूमिका महत्त्वाची

भाव प्रकट करण्याच्या हेतूने मान, उच्छवास, भुवया व डोळ्याचे विस्फारणे इत्यादींचा वापर करणे हे हाव. हालचाल आणि हातवाऱ्यांखेरीजची शरीरांगांची सूक्ष्म चलने म्हणजे हाव असा अर्थ मानणे सोयीचे राहील. आता राहिला भाव. मनावरचा कोणताही तरंग म्हणजे भाव. भाव म्हणजे स्थिर मनातली कोणतीही सूक्ष्म चलबिचल हा सोपा अर्थ ध्यानात घेऊ. विशिष्ट प्रसंगाच्या अनुषंगाने भाव जेव्हा एक खास परंग घेऊन येतो तेव्हा निर्माण होते ती भावना. आपल्या हातवाऱ्यांचे आणि हावभावांचे भाषणाबरोबरोबरचे नाते काय ते पाहावयाचे.

भाषणाचा स्वत:चा म्हणून जो काही परिणाम असतो त्याच्याशी हातवारे-हावभावांचे नाते दोन प्रकारचे संभवते. एक तर भाषणाच्या अर्थाला त्यांच्यामुळे दुजोरा मिळावा किंवा भाषणार्थास त्यांच्यामुळे छेद जावा.

भाषण, हातवारे आणि हावभाव हे तिन्ही एक समान आविष्काराचे घटक म्हणून येत असल्याकारणाने त्यांचे एकमेकांशी काहीही नाते नसणे संभवत नाही. मूळ भाषणार्थ कोणता हे समजून घेण्यात चूक झाली तर भाग वेगळा. पण सर्वसाधारणत: कोणत्या भाषणाबरोबर कोणते हातवारे वगैरे असावेत याची सूचना भाषणांतूनच मिळत असते. हातवारे आणि हावभाव जर निश्चित संकेतांच्या साखळीत बसविले तर नृत्यातली मुद्रांची भाषा तयार होते हे सर्वाना माहिती आहे.

शरीरापासून दूर/जवळ जाण्याची क्रिया हात किती झपाटय़ाने, वेगाने करतात यातूनही भावनांचा आवेग दर्शविला जातो. काहीशी विरोधाभासात्मक बाब अशी की भावनाक्षोभाची तीव्रतम मानसिक अवस्था दाखविण्याकरिता हात शरीराला लगटून ठेवणे ‘बोलके’ ठरते.

भाषणकर्त्यांचे शिष्टपण, गावंढळपण किंवा त्याच्या मनाचा समतोल/तिरकसपणा दर्शविण्यासाठी अनुक्रमे सफाईदार/खडबडीत वा हिसक्यांनी युक्त हातवारे उपयोगी पडतात.

सरळ रेषेत होणारे हातवारे आक्रमक व मर्दानी तर वक्र रेषेत होणारे मनमिळाऊ व जनानी असेही गमक मानता येईल. सर्वसाधारणत: शब्द अधिक असल्यास हातवारे कमी असे समीकरण मांडण्यास हरकत नाही. हालचाल, हातवारे आणि हावभाव यांची आपापली खास ‘भाषा’ त्याच क्रमाने अधिकाधिक सूक्ष्म होत जाते. म्हणजे असे की कर्त्यांची शरीरशक्ती कमी कमी खर्च होत जाते आणि त्याचबरोबर संदेशग्राकाची (म्हणजे प्रेक्षक वगैरेची) संवेदनशीलताही अधिकाधिक आवश्यक ठरू लागते. प्रयोग सादर करणाऱ्या बाह्य़ सोयी (उदा. प्रकाशयोजना, ध्वनिवर्धन इत्यादी) किती उपलब्ध आहेत त्याचा अंदाज घेऊनच ‘भाषा’ कितपत सूक्ष्म ठेवावी याचा निर्णय करावयाचा असतो.

फेक आणि हातवारे

मनात उद्भवलेला विकार साजेशा जलदीने व कमीत कमी अक्षरांच्या/ शब्दांच्या मदतीने दाखविण्याकरिता मानवी उद्गाराच्या या खास स्वरूपामुळे हातवाऱ्यांबरोबर त्याची सांगड घातली जाणे स्वाभाविक म्हटले पाहिजे. या स्वाभाविक संगतीमुळे हातवारे आणि उद्गारांची फेक यांनी मिळून काही अभ्यास सिद्ध होतात.

‘हा:’सारख्या कमी ध्वनींनी तयार होणाऱ्या उद्गारांची एक यादी तयार करा, यादीपैकी एक कोणताही उद्गार घेऊन बोटांची पेरे क्रमाक्रमाने वाकविताना त्याची फेक करा.

हळूहळू उद्गाराच्या फेकीचा वेग वाढवा, हाताचा पंजा सावकाश उघडा व बोटे पसरा. उभे राहून दोन्ही हात जमिनीला समांतर पसरा-पक्ष्याच्या पंखासारखे. बोटांच्या टोकापासून खांद्यापर्यंत एक लाट हळूहळू येत असून त्यानुसार बाताचा  तो तो भाग खालीवर होत आहे अशी कल्पना करून त्यानुसार हातांची हालचाल करा.

 

मार्गदर्शक सूत्रे.

हातवारे, हावभाव वगैरेंचे प्रमाण व प्रकार अंतिमत: भाषणार्थाच्या अनुषंगाने निश्चित होतात हे मूलतत्त्व ध्यानात घेता त्यांच्या जबरदस्त विविधतेची कल्पना सहजपणे करता येईल. म्हणूनच कोणत्याही परिस्थितीत निरपवादपणे लागू पडतील असे नियम सांगणे अवघड नव्हे तर अयोग्यही ठरेल. पण तरीही हातवारे आणि हावभाव कोणते असावेत ते ठरविण्यासाठी बऱ्याच प्रमाणात साहाय्यक ठरणारी काही सूत्रे पुढीलप्रमाणे मांडता येतील. सर्वसाधारणपणे असे म्हणता येईल की भावनांचा आवेग जितका तीव्र तितके हात शरीरापासून अधिक दूर नेणे स्वाभाविक वाटेल.

प्रायोजक : लोकसत्ताआयोजित आणि वीणा वर्ल्डप्रस्तुत व पॉवर्ड बाय बँक ऑफ महाराष्ट्र’, ‘द विश्वेश्वर को-ऑ. बँक लिमिटेड’, ‘आयसीडी’ (इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर डेव्हलपमेंट), ‘एमआयटी

 

संकलन –  शेखर जोशी

(अशोक दा. रानडे लिखित आणि पॉप्युलर प्रकाशन प्रकाशित भाषणरंग-व्यासपीठ आणि रंगपीठया पुस्तकावरून साभार.)