शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या साहित्याच्या अभ्यासासाठी मुंबई विद्यापीठामध्ये अध्यासन केंद्र सुरू करण्यात येणार आहे.

त्याकरिता एक कोटी रुपयांच्या निधीची तरतूद राज्य सरकारने केली आहे. यंदाच्या पुरवणी मागण्यांमध्ये हा निधी प्रस्तावित करण्यात आल्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.
ठाकरे यांचे साहित्य आजही मार्गदर्शनपर आहे. ‘मार्मिक’ या साप्ताहिकातील त्यांचे गाजलेले लिखाण, व्यंगचित्रे या त्यांच्या साहित्यातून नवीन पिढीला अधिक मार्गदर्शन व्हावे आणि त्यांचे साहित्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावे या दृष्टीने या अध्यासनाची निर्मिती करण्यात आल्याचे तावडे यांनी सांगितले.