लांब पल्ल्याच्या गाडय़ांच्या वेळापत्रकातही बदल

नवीन सिग्नल यंत्रणा आणि ट्रॅकच्या दुरुस्तीसाठी मध्य रेल्वेदादर- माटुंगा स्थानकांदरम्यान गुरुवारी रात्री १२.५० ते पहाटे ५ वाजेपर्यत ब्लॉक घेणार आहे. ब्लॉकमुळे उपनगरीय सेवा आणि लांब पल्ल्याच्या गाडय़ांच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आले आहेत.

सीएसएमटी-कुर्ला ही रात्री ११.४८ची गाडी आणि कुर्ला- सीएसएमटी ही रात्री १२.३१ची गाडी रद्द करण्यात आली आहे. कुर्ला-सीएसएमटी ही पहाटे ४.५१ची आणि ५.५४ची गाडी रद्द करण्यात आली आहे.

शिवाय सीएसएमटी-डोंबिवली ही रात्री १०.१८ ची, दादर ते डोंबिवली रात्री १०.४८ची, कल्याण ते दादर ही रात्री ११.१२ची गाडी कुर्ला स्थानकापर्यंतच चालविण्यात येईल. गुरुवारी पहाटे ५.२४ची सीएसएमटी-अंबरनाथ गाडी विद्याविहार स्थानकातून पहाटे ५.५५ला सुटेल.

ब्लॉकदरम्यान रात्री १२.३६ ते पहाटे ४.५६ वाजेपर्यत अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील गाडय़ा जलद मार्गावरून चालविण्यात येतील. या उपनगरी गाडय़ा चिंचपोकळी, करीरोड आणि विद्याविहार स्थानकात थांबणार नाहीत, असे सांगण्यात आले.

शनिवार

शनिवारी रात्री ११.१५ ते रविवारी सकाळी ६ पर्यत अप आणि डाऊन जलद मार्गावर तसेच दादर टर्मिनसमध्ये रात्री १२.१५ ते पहाटे ४.४५ वाजेपर्यत ब्लॉक असेल. ब्लॉकमुळे भुसावळ-सीएसएमटी आणि सीएसएमटी-भुसावळ पॅसेंजर, शनिवारी मुंबईहून पुण्याकडे जाणारी आणि रविवारी पुण्याहून मुंबईकडे येणारी इंद्रायणी एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. सीएसएमटी-कल्याण ही रात्री ९.५४ ची गाडी आणि कल्याण-सीएसएमटी ही रात्री ११.५ची गाडी रद्द करण्यात आली आहे. अप जलद मार्गावरील उपनगरी गाडय़ांची वाहतूक अप धीम्या गतीच्या मार्गावरून चालविण्यात येईल.

रविवार

रविवारी रात्री १२.१५ते सोमवारी पहाटे ५.३०पर्यंत अप-डाऊन जलद मार्गावर तसेच दादर टर्मिनसला रात्री १२.१५ ते पहाटे ४.४५र्पय ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक दरम्यान अप जलद मार्गावरील वाहतूक अप मंदगती मार्गावरून वळवण्यात येईल.

सोमवार

सोमवारी रात्री १२.४५ ते पहाटे ४.३०पर्यंत, दादर टर्मिनसला रात्री १२.४५ ते पहाटे ४.३० वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉकदरम्यान सीएसएमटी- ठाणे ही रात्री १०.३८ची उपनगरी गाडी आणि १२.२८ची ठाणे- सीएसएमटी गाडी, त्याचबरोबर सीएसएमटी-कुर्ला ही रात्री १२.३१ ची गाडी रद्द करण्यात आली आहे. पहाटे ४ वाजता सुटणारी ठाणे- सीएसएमटी गाडी, कुर्ला- सीएसएमटी ही पहाटे ४.५१ची आणि ५.५४ची गाडी रद्द करण्यात आली आहे. बदलापूर- सीएसएमटी ही रात्री ९.५८ची गाडी आणि रात्री ११.३१ची गाडी कुर्ला स्थानकापर्यंत तर खोपोली- सीएसएमटी रात्री १०.१५ची गाडी ठाणे स्थानकापर्यंतच चालवण्यात येईल. सीएसएमटी-कसारा ही पहाटे ४.१५ ची गाडी आणि सकाळी ६.०२ची गाडी कुर्ला स्थानकातून, तर सीएसएमटी- कर्जत ही पहाटे ५.२०ची गाडी ठाणे स्थानकातून सुटेल.