26 February 2021

News Flash

खोळंबलेल्या प्रवाशांसाठी महानगरपालिकेच्या शाळांमध्ये तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था

सर्व शाळांमध्ये महानगर पालिकेच्या संबंधित कर्मचाऱ्यांना कार्यरत राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत

मुसळधार पावसामुळे मध्य व पश्चिम रेल्वेच्या सेवा बाधीत झाल्या आहेत. अनेक प्रवासी रेल्वे स्थानकांवर खोळंबले असून जागोजागी अडकून पडले आहेत. मुंबई महापालिकेने रेल्वे स्थानकांवर अडकलेल्या प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे स्थानकाजवळ असणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या शाळांमध्ये तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था करण्यासोबतच पिण्याचे पाणी तसंच इतर व्यवस्था करण्यात आली आहे. या सर्व शाळांमध्ये महानगर पालिकेच्या संबंधित कर्मचाऱ्यांना कार्यरत राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

या शाळांची संक्षिप्त माहिती पुढीलप्रमाणे आहे:

# छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक आठ व नऊच्या प्रवेश द्वारासमोर समोर आणि जीपीओच्या (मोठे पोस्ट ऑफिस) देखील समोर असणार्‍या मनमोहन दास मनपा शाळा
# मशिद रेल्वेस्थानकाजवळ जेआर मनपा उर्दू शाळा
# मरीन लाईन्स स्टेशन जवळ श्रीकांत पाटेकर मार्गावर चंदनवाडी मनपा शाळा
# मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाजवळ गिल्डर लेन हिंदी मनपा शाळा
# ग्रॅन्ट रोड रेल्वे स्थानकाजवळ जगन्नाथ शंकर शेठ मनपा शाळा
# भायखळा स्थानकाजवळ सावित्रीबाई फुले मनपा हिंदी शाळा
# मध्य रेल्वेच्या परळ रेल्वे स्थानकाजवळ व हाफकिन इन्स्टिट्यूटच्या बाजूला असणारी बारादेवी मनपा शाळा
# लोअर परेल पश्चिम व करी रोड पश्चिम या दोन्ही रेल्वे स्थानकांजवळ ना.म. जोशी मार्गावरील नामजोशी मनपा शाळा आणि साळसेकरवाडी येथील मनपा शाळा
# दादर पश्चिम परिसरात रेल्वेस्थानकाजवळ कबूतर खाना जवळ असणारी भवानी शंकर मनपा शाळा आणि पोर्तुगीज चर्च जवळ “गोखले रोड मनपा शाळा क्रमांक दोन”
# दादर पश्चिम व माटुंगा पश्चिम परिसरात यशवंतराव चव्हाण नाट्यगृह जवळ असणारी “दादर वूलन मिल मनपा शाळा”
# माहीम स्टेशन जवळ सोनावाला अग्यारी लेन दत्तमंदिर मैदानाजवळ असणारी मोरी रोड मनपा शाळा
# वांद्रे पूर्व परिसरात खेरवाडी मनपा शाळा
# सांताक्रूझ पूर्व स्टेशन जवळ वाकोला मनपा हिंदी शाळा आणि कलिना मनपा हिंदी शाळा
# अंधेरी पश्चिम परिसरात टाटा कंपाउंड मनपा शाळा
# बोरिवली पश्चिम परिसरात प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात जवळ “सोडावला लेन मनपा शाळा”
# बोरिवली पूर्व परिसरात दत्तपाडा मनपा शाळा आणि कस्तुरबा क्रॉस लेन मनपा शाळा क्रमांक 2
# घाटकोपर पश्चिम परिसरात साई नगर मनपा मराठी शाळा क्रमांक 2, बरवे नगर मनपा शाळा, पंतनगर मनपा शाळा
# गोवंडी स्टेशन जवळ देवनार कॉलनी मनपा शाळा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2019 9:49 pm

Web Title: bmc arrange shelter for stranded commuters in schools mumbai rain sgy 87
Next Stories
1 रेणुका शहाणेंना पावसाचा फटका
2 ‘परळचा राजा’ मंडळाकडून रेल्वे स्थानकात अडकलेल्या प्रवाशांसाठी जेवणाची सोय
3 VIDEO: घाटकोपर स्थानकामध्ये चेंगराचेंगरी
Just Now!
X