18 November 2017

News Flash

आता राज ठाकरे यांचा फेसबुकवर अपमान; पालघरमधील मुलाला अटक

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरूध्द फेसबुकवर अपमानकारक लिहिल्याची घटना समोर आली आहे. सुनील विश्वकर्मा

Updated: November 28, 2012 3:33 AM

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर पाळण्यात आलेल्या ‘मुंबई बंद’बाबत दोन तरूणींनी फेसबुकवर प्रतिक्रीया नोंदविल्याचा वाद थंड होण्याची चिन्ह दिसत असताना आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरूध्द फेसबुकवर अपमानकारक लिहिल्याची घटना समोर आली आहे. सुनील विश्वकर्मा (१९) या मुलाने ही प्रतिक्रिया नोंदवली असून, विशेष म्हणजे सुनील देखिल पालघर येथीलच रहिवासी आहे.
या संदर्भात माहिती मिळताच मनसे कार्यकर्त्यांनी सुनील विश्वकर्मा याला पोलिस स्टेशनमध्ये नेले आहे. मागील प्रकरणात मुलींना अटक केल्यावरून सदर पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती, त्यामुळे या प्रकरणी पोलिसांना कायदेशीर मदतीच्या प्रतिक्षेत असून पोलिसांनी अद्याप त्या मुलावर कोणतीच कारवाई केलेली नाही.
 

First Published on November 28, 2012 3:33 am

Web Title: boy arrested for abusing mns raj thackeray on facebook