News Flash

फुड स्टॉलच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी भाजपा नगरसेविकेवर गुन्हा दाखल

नगरसेविकेने याआधी त्या व्यक्तीच्या विरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली होती

नगरसेविकेसोबत तीन कार्यकर्त्यांवर विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे

गेल्या महिन्यात मालाड येथे फास्ट फूड स्टॉल कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याच्या आरोपांखाली बांगूर नगर पोलिसांनी शनिवारी भारतीय जनता पक्षाच्या एका नगरसेवकाविरूद्ध गुन्हा दाखल केला. त्याआधी नगरसेविकेने विनयभंगाचा आरोप केल्यानंतर त्या व्यक्तीला अटक करण्यात आली होती. अटकेनंतर त्या व्यक्तीला न्यायालयीन कोठडीत पाच दिवस घालवावे लागले होते. पोलिसांनी मारहाणीची तक्रार मिळाल्यानंतर नगरसेविकेविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

२० मे रोजी भांडण झाल्यानंतर तेथील एका कर्मचाऱ्यावर प्लास्टिक पाईपने हल्ला केल्याची तक्रार दिल्यानंतर बांगूर नगर पोलिसांनी शनिवारी पालिकेच्या नगरसेवकाविरोधात मारहाण, धमकी आणि चोरीबद्दल गुन्हा नोंदविला आहे. त्याआधी नगरसेविकेने आरोपीविरूद्ध विनयभंगाची तक्रार दाखल केली होती, त्यानंतर त्याला अटक करण्यात आली आणि पाच दिवस कोठडीत घालवावे लागले.

नगरसेविकेनीही केली होती तक्रार

नगसेविकेनेदेखील त्यांच्या विरोधात बांगूरनगर पोलिसांत तक्रार केली आहे होती. निर्बंध असतानाही दुकान सुरू असल्याचे दिसल्याने हटकले असताना दुकानदाराने विनयभंग केल्याचा आरोप नगरसेविकेने केला आहे होता. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. या घटनेनंतर पोलीस ठाण्यात नेल्यानंतर त्या व्यक्तीविरुद्ध विनयभंगाच्या गुन्हा दाखल करण्यात आला. २० मे रोजी अटक करण्यात आल्यानंतर बोरिवली येथील कारागृहात ठेवण्यात आलं. कोर्टाने त्याला ठाणे कारागृहात न्यायालयीन कोठडी सुनावली त्यानंतर कारागृहाशेजारील केंद्रामध्ये काही दिवस ठेवण्यात आलं. कोर्टाकडून जामीन मिळाल्यानंतर ती व्यक्ती २५  मे रोजी बाहेर पडली. त्यानंतर १ जूनला पोलिसांकडे जाऊन त्या व्यक्तीने आपली तक्रार नोंदवली.

सलून, ब्युटी पार्लरमध्ये एसी सुरु ठेवल्यास कारवाई होणार; मुंबईच्या महापौरांचा इशारा

नगरसेविकेने मारहाण केल्याचा आरोप

“२० मे रोजी संध्याकाळी ५ च्या सुमारास समोसा विकत असताना आपण नगरसेविका असल्याचे सांगत त्या महिलेने आमच्या दुकानाची ग्रील उघडली आणि आत आली. तिने नगरसेविका असल्याचे सांगितले आणि मला शिवीगाळ केली व मला दुकानाचा परवाना व पाणीपुरवठा कोठून होतो असे विचारले. त्यानंतर तिने पाण्याचे पाईप तपासण्यासाठी बाथरूममध्ये प्रवेश केला आणि घसरुन पडली. त्यानंतर ती उठली आणि मला बाजूला असलेल्या प्लास्टिकच्या पाईपने मला मारहाण करण्यास सुरुवात केली,” असे तक्रारदाराने म्हटले आहे.

“त्यानंतर तिने आपल्या कार्यकर्त्यांना फोनवरुन बोलावले. त्यानंतर आलेल्या तीन कार्यकर्त्यांना मी त्या महिलेला ढकलले असे खोटे सांगितले. दुकानाचा खाण्याबाबत परवाना नाही असे सांगितले. त्यानंतर तिघांनी मला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. दुकानातून जाण्यापूर्वी एकाने काऊंटरच्या ड्रॉवरमधून २८ हजार रुपये चोरी करताना पाहिले. त्यानंतर त्या महिलेने  जेसीबी मशीन बोलावली आणि हॉटेलची ग्रील तोडून टाकली” असे त्या व्यक्तीने पोलिसांना सांगितले. त्या व्यक्तीने तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी नगरसेविकेसोबत तीन कार्यकर्त्यांवर कलम ४५२,३२४,५०४,५०६,४२७,३८० आणि ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 7, 2021 2:46 pm

Web Title: case has been registered against a bjp corporator for assaulting a food stall employee abn 97
टॅग : Crime News
Next Stories
1 केंद्राने एक्साईजमध्ये वाढ करून ग्राहकांची लूट केली; अशोक चव्हाण यांची टीका
2 सलून, ब्युटी पार्लरमध्ये एसी सुरु ठेवल्यास कारवाई होणार; मुंबईच्या महापौरांचा इशारा
3 …नाहीतर लोक ऑफिसला कसे जाणार?; मुंबईतील निर्बंधांवरून काँग्रेस नेत्याचा ठाकरे सरकारला सवाल
Just Now!
X