दहा ठिकाणी शिक्षण मंडळात बदल

मुंबई : पालिके च्या दहा शाळांमध्ये लवकरच सीबीएसई मंडळाच्या शाळा सुरू होणार आहेत. पालकांचा इंग्रजी माध्यमाकडे कल वाढू लागलेला आहे. त्यामुळे पालिके ने सीबीएसई मंडळाच्या शाळांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

जागतिकीकरणाच्या स्पर्धेत आपली मुले टिकू न राहावी याकरिता आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकातील पालक इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मुलांना घालतात. तसेच सीबीएसई, आयसीएसई मंडळांच्या शाळेत प्रवेश घेतात. त्यामुळे प्रशासनाने पालिके च्या शाळांमध्ये सीबीएसई शाळा सुरू करण्याचे ठरवले होते. त्यानुसार गेल्या वर्षी जोगेश्वरीतील पूनमनगरमधील मुंबई पब्लिक स्कू लमध्ये सीबीएसईची शाळा सुरू करण्यात आली होती. या शाळेतील प्रत्येक इयत्तेतील ४० पैकी दोन जागा राखीव ठेवून सर्व जागा लॉटरी पद्धतीने भरण्यात आल्या आहेत.  या शाळेला मिळालेला प्रतिसाद पाहून पालिकेने आर्थिकदृष्टय़ा दुर्बल गटातील विद्यार्थ्यांसाठी  येत्या शैक्षणिक वर्षांपासून सीबीएससी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

या ठिकाणी सीबीएसईची शाळा

भवानी शंकर रोड पालिका शाळा, काणेनगर मनपा शाळा, प्रतीक्षानगर मनपा शाळा, दिंडोशी मनपा शाळा, जनकल्याण मनपा शाळा (मालाड), तुंगा व्हिलेज शाळा (कु र्ला), राजावाडी मनपा शाळा (विद्याविहार), अझीझबाग मनपा शाळा (चेंबूर), हरियाली व्हिलेज मनपा शाळा (विक्रोळी पूर्व), मिठागर शाळा (मुलुंड पूर्व)

आठ भाषिक शाळा बंद

पालिके च्या आठ भाषिक  शाळा विद्यार्थ्यांअभावी बंद करण्याची वेळ आली आहे. त्यात तीन मराठी, तीन तेलगू, एक गुजराती, एक हिंदी माध्यमाची शाळा आहे. या शाळा जवळच्या शाळेत विलीन करण्यात येणार आहेत. त्यात हिंदू कॉलनी पालिका मराठी शाळा, क. दा. गायकवाड मराठी शाळा , वरळीतील ग्लोब मिल पॅसेज मराठी शाळा या तीन शाळांचाही समावेश आहे.

९० टक्के प्रवेश सोडतीद्वारे

या शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ९० टक्के  प्रवेश सोडत पद्धतीने काढण्यात येणार असून ते विनाशुल्क असतील. तर ५ टक्के  प्रवेश महापौरांच्या शिफारशीनुसार व पाच टक्के  प्रवेश पालिके च्या कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी राखीव असतील. पालिके च्या शाळामंधील विद्यार्थ्यांना ज्या सुविधा दिल्या जातात, त्या सर्व सुविधा या मुलांना दिल्या जाणार आहेत. या शाळांमध्ये छोटा शिशू वर्ग (ज्युनिअर के जी), मोठा शिशू वर्ग (सीनिअर के जी) व इयत्ता पहिली ते सहावीपर्यंत प्रत्येक वर्गाची एक तुकडी सुरू करण्यात येणार आहे.