23 September 2020

News Flash

रेल्वे गाडय़ांच्या १० हजार डब्यांमध्ये सीसीटीव्ही

मध्य रेल्वेच्या ३५६ कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मंजुरी

मध्य रेल्वेच्या ३५६ कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मंजुरी; लोकल, डेमू, मेमूमध्ये कॅमेरे बसवणार

प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मध्य रेल्वेवरील लोकल, मेमू आणि डेमू गाडय़ांच्या १० हजार ३४९ डब्यांत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्या प्रकल्पाला केंद्रीय अर्थसंकल्पात मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे मुंबई उपनगरीय रेल्वेमार्गावर धावणाऱ्या सर्व लोकल डब्यांतही कॅमेरे बसवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या प्रकल्पाची एकूण किंमत ३५६ कोटी रुपये आहे.

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी लोकलच्या डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची घोषणा काही महिन्यांपूर्वी मुंबई दौऱ्यावर आलेल्या रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी केली होती. त्यानुसार मध्य रेल्वेने कॅमेऱ्यांचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवला होता. त्यानुसार अर्थसंकल्पातच त्याला मंजुरी मिळाली आहे. यासंदर्भात मध्य रेल्वेचे मुख्य जनंसपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी हा प्रस्ताव मंजूर झाल्याची माहिती दिली.

मुंबई उपनगरीय मार्गावरील लोकलबरोबरच दिवा ते रोहा, दिवा ते वसई मार्गावर धावणाऱ्या मेमू गाडय़ा आणि पुणे येथे लोकल व नागपूर आणि आणखी एका भागात डेमू गाडी धावते, अशा सर्व डब्यांत सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जातील, अशी माहिती दिली. यातही ९० टक्के लोकल व मेमू या मुंबईत आहेत. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात काम हे मध्य रेल्वेच्या मुंबईसाठीच होईल. सध्या २५ महिला डब्यांतच सीसीटीव्ही कॅमेरेही बसवण्यात आले आहेत.

मध्य रेल्वेच्या काही प्रकल्पांना मिळालेला निधी

  • बेलापूर ते पनवेल दुहेरी मार्ग – पाच कोटी रुपये
  • ठाणे ते तुर्भे ते नेरुळ ते वाशी मार्ग – एक कोटी रुपये
  • कल्याण ते कसारा तिसरा मार्ग – दहा कोटी
  • बेलापूर ते सीवूड ते उरण विद्युतीकरण दुहेरी मार्ग – १५३ कोटी रुपये
  • सीएसएमटी ते पनवेल अंधेरी १२ डबा लोकल हार्बर – पाच कोटी रुपये
  • पुणे ते लोणावळा तिसरा व चौथा मार्ग – एक कोटी
  • ३३७ एटीव्हीएम बदलण्यासाठी चार कोटी १४ लाख
  • मुंबई ते दिल्ली राजधानी एक्स्प्रेसचा मार्ग १६० ते २०० किलोमीटर प्रतितास वेगाने केला जाणार आहे. या प्रकल्पाच्या कामालाही मंजुरी मिळाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2019 1:23 am

Web Title: cctv in mumbai railway 2
Next Stories
1 Budget 2019 : मुंबईच्या जीवनवाहिनीला ५७८ कोटींचा निधी
2 budget 2019 : जोगेश्वरीत नवीन टर्मिनस लांब पल्ल्याच्या गाडय़ा सुटणार
3 Budget 2019 : ‘एमयूटीपी’ प्रकल्पांना बळ
Just Now!
X