01 December 2020

News Flash

मुंबईतील कराची स्वीट्सचं नाव बदला, शिवसेना नेते नितीन नांदगावकर यांची मागणी

नितीन नांदगावकर यांच्या मताशी शिवसेना सहमत आहे का? याची चर्चा

मुंबईतील कराची स्वीट्सचं नाव बदला अशी मागणी शिवसेना नेते नितीन नांदगावकर यांनी केली आहे. मुंबईतील वांद्रे भागात असलेल्या कराची स्वीट्सचं नाव बदला अशी मागणी नितीन नांदगावकर यांनी केली आहे. दरम्यान नांदगावकर यांच्या मागणीला शिवसेनेचे समर्थन आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो आहे. दरम्यान कराची पाकिस्तानातील आहे त्यामुळे आपल्या लष्करी सैनिकांचा अपमान होतो आहे असंही नितीन नांदगावकर यांनी म्हटलं आहे. यामुळेच कराची स्वीट्सचं नाव बदलावं अशी मागणी नितीन नांदगावकर यांनी केली आहे.

कराची स्वीट्स संपूर्ण देशात पसरलेली फूड चेन आहे. साधरणपणे प्रमुख शहरं आणि महानगरं यामध्ये कराची स्वीट्सची उत्पादनं विकणारे अनेक आऊटलेट्स आहेत. मुंबईतही अनेक ठिकाणी कराची बेकरीचे आऊटलेट्स आहेत. या बेकरीच्या नावातील कराची या शब्दाला नितीन नांदगावकर यांनी आक्षेप घेतला आहे. तसंच मुंबईतील कराची बेकरीच्या सगळ्याच आऊटलेट्सना त्यांनी इशारा दिला आहे. नाव रद्द करावं किंवा कराची हा शब्द काढून टाकावा अशीही मागणी नितीन नांदगावकर यांनी केली आहे.

“मुंबई आणि महाराष्ट्रात कराची नावाने कोणतेही व्यवसाय चालणार नाहीत. यामुळे तुम्ही पाकिस्तानला एक प्रकारे पाठिंबा देत असल्याचं निदर्शनास येतं. महाराष्ट्रात रहायचं असेल तर असं नाव चालणार नाही.” असं नितीन नांदगावकर यांनी म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2020 4:38 pm

Web Title: change the name of karachi sweets in mumbai demands shiv sena leader nitin nandgaonkar scj 81
Next Stories
1 कराची स्वीट्सला ‘मनसे’ दणका; न्यायालयात खेचण्याची तयारी
2 मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपा-मनसे एकत्र?; दरेकर म्हणाले…
3 “मुंबई महापालिकेबाबतचं फडणवीसांचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही”
Just Now!
X