‘गँग्ज ऑफ वासेपूर 2’ मध्ये झळकलेला अभिनेता झिशान कादरी याच्याविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. झिशानने कोटयवधींची अफरातफर केल्याचं या तक्रारीत म्हटलं आहे. अभिनेता असण्यासोबतच झिशान स्क्रीन रायटर असून त्याची ‘फ्रायडे टू फ्रायडे एन्टरटेन्मेंट’ ही कंपनीदेखील आहे.

‘न्यूज18’च्या वृत्तानुसार, अंधेरीच्या आंबोली पोलीस ठाण्यात झिशानविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. झिशानने कोटयवधींची फसवणूक केल्याचा आरोप निर्माते जतीन सेठी यांनी केला असून त्यांनी तक्रार दाखल केली आहे.

झिशान कादरी आणि त्याच्या कंपनीसोबत एका वेब सीरिजसाठी करार करण्यात आला होता. पण झिशानने माझी फसवणूक केली. या वेब सीरिजसाठी आर्थिक गुंतवणूक करतो असं सांगून त्याने माझ्याकडून पैसे घेते. मात्र, त्याने त्याच्याकडून एकाही रुपयांची गुंतवणूक केली नाही. ज्यामुळे मला कोटयवधींचं नुकसान झालं आहे, असं जतीन सेठी म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, झिशान कादरी यांच्या तक्रारीमध्ये प्रियांका बसी या महिलेच्या नावाचादेखील उल्लेख करण्यात आला आहे. झिशान याने ‘गँग्स ऑफ वासेपूर’, ‘छलांग’ आणि ‘हलचल’ यासारख्या चित्रपटांचं स्क्रीन रायटींग केलं आहे. तसंच त्याने ‘गँग्स ऑफ वासेपूर’मध्ये डेफिनेट ही भूमिका साकारली आहे.