02 March 2021

News Flash

मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी भाई जगताप यांची नियुक्ती

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीकडून नियुक्त्या जाहीर

मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी आमदार अशोक अर्जुनराव जगताप अर्थात भाई जगताप यांची निवड करण्यात आली आहे. तर चरणसिंह सप्रा यांची कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी याला मंजुरी दिली आहे.

मुंबई काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष आणि माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्याबाबत पक्षांतर्गत नाराजीचा सूर होता. त्यामुळेच हे खांदेपालट करण्यात आले आहे. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी अनेक जणांची लॉबिंग सुरु असल्याचे सुत्रांकडून कळते. यामध्ये वर्षा गायकवाड, मिलिंद देवरा, चरणसिंह सप्रा, अस्लम शेख यांचा समावेश होता. यांपैकी अध्यक्षपदी सूत्रं अखेर भाई जगताप यांच्याकडे गेली आहेत.

दरम्यान, इतर इच्छुकांनाही काहीना काही पदं देण्यात आली आहेत. यांपैकी मोहम्मद आरिफ नसिम खान (प्रचार समितीचे, अध्यक्ष), डॉ. अमरजितसिंह मनहास (समन्वय समिती, अध्यक्ष), सुरेश शेट्टी (जाहीरनामा आणि प्रकाशन समिती, अध्यक्ष), चंद्रकांत हंडोरे (मुंबईचे प्रभारी), गणेश यादव (तपासणी आणि रणनीती समिती, सचिव), प्रिया दत्त, अमिन पटेल, जनेत डिसुझा, उपेंद्र दोशी यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2020 8:49 pm

Web Title: congress appoints bhai jagthap as president and charan singh sapra as working president of mumbai congress aau 85
Next Stories
1 “मेट्रो कारशेड स्थलांतरित करताना मुख्यमंत्र्यांनी कोणता ‘चांगला’ विचार केला होता? हे सांगावे”
2 मुंबईत रेल्वेरुळावर सापडले तिघांचे मृतदेह; आत्महत्या केल्याचा संशय
3 “महाराष्ट्रात जेव्हा ज्वलंत हिंदुत्ववाद्यांनी…”; भाजपा नेत्याचा शिवेसेनेला सवाल
Just Now!
X