News Flash

प्रत्येक जिल्ह्यात करोना चाचणी प्रयोगशाळा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

संग्रहित छायाचित्र

राज्यात दिवसेंदिवस करोना रुग्णांची संख्या वाढणे ही चिंतेची बाब आहे. आगामी काळात करोनाचे आव्हान यशस्वीपणे पेलण्यासाठी  प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी कोरोनाची चाचणी करणाऱ्या प्रयोगशाळा उभारल्या जातील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

हा लढा सकारात्मकरीत्या लढावा लागेल. जालना जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात उभारण्यात आलेल्या कोविड —१९ आरटीपीटीसीआर प्रयोगशाळेचे ऑनलाइन उद्घाटन  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे  उपस्थित होते.

मार्च महिन्यात आपल्या राज्यात करोनाची चाचणी करणाऱ्या केवळ दोनच प्रयोगशाळा होत्या. आज त्यांची संख्या ११० वर पोहचली आहे. येणाऱ्या काळात प्रत्येक जिल्हा मुख्यालयात अशी प्रयोगशाळा उभारण्यात येईल. करोना बाधितांवर उपचारासाठी काही ठिकाणी आरोग्य सुविधांची तात्पुरत्या स्वरूपात उभारणी करण्यात आली असून येणाऱ्या काळात या सुविधा कायमस्वरूपी उपलब्ध करून देण्याची सूचनाही प्रशासनाला के ल्याचे ठाकरे यांनी सांगितले.

जालना जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात उभारण्यात आलेल्या बी.एस.एल.—३ या आधुनिक पध्दतीच्या प्रयोगशाळेच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणावर करोना चाचण्या करून रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2020 12:22 am

Web Title: corona testing laboratories in each district abn 97
टॅग : Coronavirus
Next Stories
1 खासगी कर्मचाऱ्यांच्या सामूहिक चाचण्या
2 विद्यापीठाचे ८ कर्मचारी करोनाबाधित, ७० कर्मचाऱ्यांचे विलगीकरण
3 क्यूआर कोड पास नसेल, तर लोकल प्रवेश नाही
Just Now!
X