मुंबई  : तीन दिवसांनंतर राज्यातील करोना रुग्णांच्या दैनंदिन संख्येत किं चित वाढ झाली. दिवसभरात १२,२०७ नव्या रुग्णांची नोंद झाली असून, ३९३ जणांचा मृत्यू झाला. गेल्या २४ तासात रायगड ५८०, नाशिक जिल्हा १४९३, नगर जिल्हा ७८४, पुणे शहर ३६२, उर्वरित पुणे जिल्हा ७४७, सातारा ८४८, कोल्हापूर जिल्हा १४४०, सांगली १०४४ नवे रुग्ण आढळले. राज्यात सध्या १ लाख ६० रुग्ण उपचाराधीन आहेत. पुणे जिल्हा १९,५२१, कोल्हापूर जिल्हा १७,३७० तर मुंबईत १८,१५७ रुग्ण उपचाराधीन आहेत.

मुंबईत ६६० बाधित

मुंबईत गुरुवारी ६६० नव्या रुग्णांची नोंद झाली तर २२ रुग्णांचा मृत्यू झाला. बुधवारी २५ हजारांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या असून बाधितांचे प्रमाण २.५९  टक्के आहे. मुंबईत  एकूण बाधितांची संख्या ७ लाख १४ हजारांपुढे गेली आहे. तर करोना मृतांची एकू ण संख्या १५ हजार १२२ झाली आहे.एका दिवसात ७६८ रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत ६ लाख ८१ हजारांहून अधिक  म्हणजेच ९५ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.  सध्या १५ हजार ८११ उपचाराधीन रुग्ण आहेत. मुंबईतील रुग्णवाढीचा दर ०.१२ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. रुग्ण दुपटीचा कालावधीही ५६६ दिवसांवर पोहोचला आहे.

ठाणे जिल्ह्यात ४९८ जणांना करोना 

ठाणे जिल्ह्यात गुरुवारी ४९८ करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर, ६५ जणांचा मृत्यू झाला आहे. अंबरनाथमध्ये मार्च ते मे या कालावधीत करोना मृतांच्या आकड्यांचा फेरआढावा घेण्यात आल्याने तेथे गुरुवारी ४५ मृतांची नोंद झाल्याची माहिती अंबरनाथ नगरपालिकेकडून देण्यात आली. ठाणे जिल्ह्यातील ४९८ रुग्णांपैकी कल्याण-डोंबिवली १७२, ठाणे १०९, मिरा भाईंदर ६६, नवी मुंबई ५६, ठाणे ग्रामीण ५३, अंबरनाथ २०, उल्हासनगर १०, बदलापूर १० आणि भिवंडीत दोन रुग्ण आढळून आले.