मुंबई : राज्यात दिवसभरात करोनाच्या ३,५८६ नव्या रुग्णांची नोंद झाली तर ६७ जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात ४४१० रुग्ण करोनामुक्त झाले असून उपचाराधीन रुग्णांची संख्या ४८ हजार ४५१ इतकी आहे.

गेल्या २४ तासांत मुंबई येथे ४७२, नवी मुंबई ८३, कल्याण-डोंबिवली ५८, रायगड ७८, पनवेल ७४, नाशिक ६५, अहमदनगर ७४२, पुणे जिल्हा ४९५, पुणे शहर १७७, पिंपरी-चिंचवड १३१, सोलापूर ३०१, सातारा १९२, सांगली १४३, रत्नागिरी ६५, उस्मानाबाद ४३, बीड येथे ४५ रुग्णांची नोंद झाली.

मुंबईत ३ जणांचा मृत्यू

मुंबईत शुक्रवारी ४३४ करोनाबाधित आढळले, तर तीन जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत एकू ण बाधित रुग्णांची संख्या ७ लाख ३७ हजार १६४, तर मृतांची संख्या १६ हजार ४२ झाली आहे. सध्या ४ हजार ६५८ सक्रि य रुग्ण आहेत.

शुक्र वारी ३८७ करोना रुग्ण बरे झाले. आतापर्यंत बरे झालेली रुग्णसंख्या ७ लाख १३ हजार ९९२ पर्यंत पोहोचली आहे. तर ४० हजार ४४३ चाचण्या करण्यात आल्या. मुंबईत करोनामुक्तांचा दर ९७ टक्के आहे. तर रुग्ण दुप्पटीचा दर १ हजार २८९ दिवसांवर पोहोचला आहे.

ठाणे जिल्ह्यात २६४ बाधित

ठाणे जिल्ह्यात शुक्रवारी २६४ करोना रुग्ण आढळून आले. तर चार जणांचा मृत्यू झाला. नवी मुंबईत ७६, कल्याण-डोंबिवली ५३, ठाणे ४८, ठाणे ग्रामीण ३१, मिरा भाईंदर २६, बदलापूर १३, उल्हासनगर आठ, अंबरनाथ सात आणि भिवंडीत दोन रुग्ण आढळून आले. तर नवी मुंबई दोन, कल्याण-डोंबिवली एक आणि ठाणे ग्रामीणमधील एकाचा मृत्यू झाला आहे.