11 August 2020

News Flash

Coronavirus: धारावीत सफाई कर्मचाऱ्याला करोनाची लागण, आरोग्य विभागाची चिंता वाढली

धारावीत करोनाच्या रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर आधीच आरोग्य विभागाची चिंता वाढली असताना आता अजून एक रुग्ण सापडला आहे

धारावी (प्रातिनिधिक फाइल फोटो)

धारावीत करोनाच्या रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर आधीच आरोग्य विभागाची चिंता वाढली असताना आता अजून एक रुग्ण सापडला आहे. धारावीत एका सफाई कर्मचाऱ्याला करोनाची लागण झाली आहे. महापालिकेच्या ५२ वर्षीय सफाई कर्मचाऱ्याला करोनाची लागण झाली आहे. हा सफाई कर्मचारी वरळीचा रहिवासी आहे. धारावीत त्याला तैनात करण्यात आलं होतं. करोनाची लक्षणं आढळल्याने अधिकाऱ्यांना त्याला वैद्यकीय तपासणी करण्यास सांगितलं होतं. यावेळी त्याला करोनाची लागण झाली असल्याचं स्पष्ट झालं. वरळी कोळीवाडय़ापाठोपाठ दाटीवाटीच्या धारावी परिसरात करोनाने शिरकाव केला असल्याने धोका निर्माण झाला असून आरोग्य यंत्रणांसमोर मोठं आव्हान आहे. सध्या या सफाई कर्मचाऱ्याची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे. या सफाई कर्मचाऱ्याच्या कुटुंब आणि सहकाऱ्यांना क्वारंटाइनचा सल्ला देण्यात आला आहे.

धारावीत करोनाबाधिताचा मृत्यू –

धारावीमधील करोना रुग्णाचा बुधवारी मृत्यू झाला. मुंबई महापालिकेने धारावीतील बालिका नगर परिसरात राहणाऱ्या ५६ वर्षीय व्यक्तीला करोनाची लागण झाली असल्याची माहिती दिली होती. उपचारासाठी त्याला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण बुधवारी सायंकाळी ७.३० वाजता या रुग्णाचा मृत्यू झाला. धारावीतील या रुग्णाला २३ मार्चपासून ताप येत होता. २६ मार्च रोजी त्याने खासगी दवाखान्यात उपचार घेतले. मात्र, काहीच फरक न पडल्याने २९ मार्च रोजी त्याला लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याला करोना झाल्याचे बुधवारी स्पष्ट झालं होतं. त्यानंतर सायंकाळी ७.३० वाजता या रुग्णाचा मृत्यू झाला. या रुग्णाच्या संपर्कात आलेले रुग्णालयातील कर्मचारी, डॉक्टर यांना विलगीकरण कक्षात ठेवण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

रुग्ण राहात असलेल्या परिसरातील आठ इमारतींमधील ३०८ सदनिकांमधील नागरिकांना घऱाच क्वारंटाइन करण्यात आलं आहे. तर वरळी कोळीवाडा येथील ८६ नागरिकांना पोद्दार रुग्णालयात विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 2, 2020 1:06 pm

Web Title: coronavirus one more patient found in dharavi sgy 87
टॅग Coronavirus
Next Stories
1 सिद्धिविनायकाचा रक्तदान महायज्ञ सुरू!
2 खळबळजनक : करोनाग्रस्त व्यक्ती रुग्णांच्या संपर्कात आल्यानं मुंबईत हॉस्पिटल केलं सील
3 Coronavirus : मुंबईत आईसह तीन दिवसांच्या तान्ह्या बाळाला करोनाची लागण
Just Now!
X