धवल कुलकर्णी

करोना रोगामुळे सध्या सुरू असलेला लॉकडाउनचा भयंकर परिणाम हा मुंबई आणि महाराष्ट्रातील ईशान्य भारतातल्या राज्यांमधून येऊन इथे नोकरी आणि उद्योग करणाऱ्या लोकांवर झाला आहे. मुंबईमध्ये साधारणपणे आठ हजारच्या आसपास असे नागरिक आहे ते मुळात पूर्वोत्तर राज्यांमधून जसे की मिझोराम नागालँड मणिपूर वगैरे मुंबईत आले आहेत. हे लोक एकतर लहान-सहान उद्योग करतात किंवा कॉल सेंटर स्पा आणि ब्युटी पार्लर मध्ये नोकरीला आहेत.

लॉकडाउनमुळे पगार आणि भत्ते अचानक बंद झाल्यामुळे यांच्यापैकी काही मंडळीवर अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे तर काहीजणांना आतापासूनच त्यांचे घर मालक महिन्याच्या भाड्यासाठी तगादा लावत असल्यामुळे त्रास होत आहे.

“महाराष्ट्रात साधारणपणे १७ ते १८ हजार लोक भारतात येतात तर मुंबईमध्ये यांची संख्या साधारणपणे आठ हजाराच्या आसपास आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचाही समावेश होतो. आमच्यापैकी बहुतांश मंडळी ही खाजगी किंवा अन ऑर्गनाइज क्षेत्रांमध्ये कामाला आहे. उदाहरणार्थ मिझोराम नागालँड मणिपूर मधील मुली या ब्युटी पार्लर किंवा स्पा मध्ये नोकरी करतात, काहीजण कॉल सेंटर मध्ये सुद्धा काम करतात आणि बाकीची मंडळी हॉटेल मध्ये आणि शोरूम मध्ये कामाला आहेत,” असे लिओ ठर्मी राईकान यांनी सांगितले.

ते स्वतः जिल्हा एकोणीस वर्षापासून मुंबई च्या कलिना येथे स्थायिक झाले असून त्यांचा स्वतःचा स्पा आणि सालून आहे मात्र lockdown मुळे हा व्यवसाय बंद करावा लागला असून उत्पन्नाचा कुठला स्रोत नसताना जागामालकाला भाडं कसे देऊ हा प्रश्न त्यांच्यासमोर आ वासून उभा आहे.

“आम्ही लोक मुळात इथे येतो ते नोकरी करून घरी पैसे पाठवायला. पगार आणि कमाई अचानक बंद जाण्यात झाल्यामुळे आमच्यासमोर मोठं संकट उभं राहिलं आहे. महिन्याच्या अखेरीस आम्ही भाडे भरले नाही तर कदाचित आम्हाला राहत्या घरांमधून घर मालक बाहेर काढेल अशी भीती बऱ्याच लोकांना वाटते. आम्हीसुद्धा भारताचा एक अविभाज्य भाग आहोत. आमची अशी विनंती आहे की कलीना, खार, जुहू, मिरा रोड यासारख्या भागांमध्ये विखुरलेल्या आमच्या लोकांच्या सरकारने आणि आणि इतर यंत्रणांनी मदत करावी,” अशी मागणी लिओ यांनी केली.

भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी असे निदर्शनास आणून दिले की भाडे भरण्याचा विषय हा झोपडपट्ट्यांमध्ये आणि चाळी मध्ये राहणाऱ्या मुंबईकरांनाही भेडसावणार कारण त्यांचा रोजगार सुद्धा अचानकच बंद झाला आहे.