News Flash

पाकिस्तानविरोधात शिवसेनेची निदर्शने

पाकिस्तानी हॉकी खेळाडूंच्या सहभागाबद्दल मुंबई हॉकी असोसिएशनच्या क्रीडांगणापुढे शिवसेना कार्यकर्त्यांनी रविवारी दुपारी निदर्शने केली. त्यामुळे सरावाचे सत्र रद्द करावे लागले.

| January 14, 2013 02:30 am

पाकिस्तानी हॉकी खेळाडूंच्या सहभागाबद्दल मुंबई हॉकी असोसिएशनच्या क्रीडांगणापुढे शिवसेना कार्यकर्त्यांनी रविवारी दुपारी निदर्शने केली. त्यामुळे सरावाचे सत्र रद्द करावे लागले.
पाकिस्तानी सैनिकांनी दोन भारतीय जवानांची निर्घृण हत्या केल्याने भारतात तीव्र संतापाचे वातावरण आहे. या परिस्थितीत पाकिस्तानचे चार हॉकी खेळाडू मेहमूद रशीद, फरीद अहमद, मोहम्मद तौसिक व इमरान भट्ट हे ‘मुंबई मॅजिशियन’ संघाच्या सराव शिबीरात सहभागी होण्यासाठी आल्याचे समजल्याने शिवसेना कार्यकर्त्यांनी वानखेडे स्टेडियमजवळ निदर्शने केली. संघाचा पहिला सामना २० जानेवारीला होणार आहे. निदर्शने सुरू झाल्याने हे खेळाडू सराव सुरू होण्याआधीच निघून गेले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2013 2:30 am

Web Title: demonstration of shivsena against pakistan
टॅग : Hockey,Pakistan,Sports
Next Stories
1 शिवसेनेकडून प्रतिसाद नसल्याने रिपाइंमध्ये घालमेल
2 प्रवाशांचा ‘समजूतदार’पणा रेल्वेच्या पथ्यावर
3 माथेरानच्या गाडीला जागतिक दर्जा देण्यास रेल्वे पुन्हा प्रयत्नशील
Just Now!
X